गरीबांनी कुठून आणावे हजार रुपये?जिल्हा परिषदे मध्येही परीक्षा शुल्क बेरोजगारांना डोईजड

68

नोकरभरती परीक्षा शुल्क बेरोजगारांना डोईजड अनाथ, गरीबांनी कुठून आणावे हजार रुपये?
राज्यभरात विविध विभागांचीसुमारे ७५ हजार पदे भरण्यात येणार असून,  जिल्हा परिषदेमध्येही कर्मचाऱ्यांची  रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.

यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र भरतीसाठी परीक्षा शुल्क एक हजार ते ९०० रुपये आकारण्यात आल्याने ही बेरोजगारांची थट्टाच असल्याची संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
राज्यातील जिल्हा परिषद भरती प्रक्रिया राबवण्याचे कंत्राट खासगी एजन्सीला देण्यात आले आहे.  जिल्हा परिषदेत  पदांची भरती करण्यात येणार आहे.

यामध्ये विविधविभागांतील पदे असून परीक्षेसाठी एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. सॉफ्टवेअरची कॉपी जिल्हा परिषदांना पाठवण्यात आली आहे. त्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त केली असून, या भरती प्रकियेतूनखासगी एजन्सी मात्र मालामाल होणार आहे.

या परीक्षा शुल्काचा विषय
गाजला होता.विधानसभेतही त्यानंतरही भरमसाठ शुल्क आकारणी कायमच असल्याने बेरोजगारांपुढे मोठा प्रश्न निर्माण होत आहे. गरप्रश्न निर्माण होत आहे. गरीब बेरोजगार युवकांना वंचित ठेवण्याचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप होत आहे.

ऑफलाइनएमपीएससीच्यापरीक्षेसाठी ३०० ते ३५० रुपये शुल्क असताना ही ऑनलाइन परीक्षा असूनही येथेच जास्त शुल्क का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अनाथांवरही अन्याय ■ या पदभरतीत अनाथांसाठी मोजक्या जागा राखीव असल्या तरी परीक्षा शुल्कात त्यांना कोणतीही विशेष सवलत प्रदान केलेली नाही.

त्यांचावरही या अनिवार्य शुल्काचा भार पडणार आहे. आधीच अनाथ असलेल्यांनी एवढी परीक्षा शुल्क भरण्यासाठी पैसे आणावे कूठुन,असाही प्रश्न आहे.

जाहिरात क्र.: 01/2023

Total: 19460 जागा

पदाचे नाव: 

पद क्र.पदाचे नावपद क्र.पदाचे नाव
1आरोग्य पर्यवेक्षक15जोडारी
2आरोग्य सेवक (पुरुष)16 पर्यवेक्षिका
3आरोग्य सेवक (महिला)17 पशुधन पर्यवेक्षक
4औषध निर्माण अधिकारी18प्रयोगशाळा तंत्रज्ञ
5कंत्राटी ग्रामसेवक19यांत्रिकी
6कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)20रिगमन (दोरखंडवाला)
7कनिष्ठ अभियंता (विद्युत)21 वरिष्ठ सहाय्यक लिपिक
8कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)22वरिष्ठ सहाय्यक लेखा
9कनिष्ठ आरेखक23विस्तार अधिकारी (कृषी)
10कनिष्ठ यांत्रिकी24विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
11कनिष्ठ लेखाधिकारी25 विस्तार अधिकारी (शिक्षण)
12कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)26 विस्तार अधिकारी (पंचायत)
13कनिष्ठ सहाय्यक (लेखा)27स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)
14तारतंत्री28लघुलेखक (उच्चश्रेणी)

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) विज्ञान शाखेतील पदवी   (ii) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा कोर्स
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
  3. पद क्र.3: सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद
  4. पद क्र.4: B.Pharm/D.Pharm
  5. पद क्र.5: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी
  6. पद क्र.6: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
  7. पद क्र.7: विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
  8. पद क्र.8: यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
  9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थापत्य आरेखक कोर्स
  10. पद क्र.10: (i) तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स   (ii) 05 वर्षे अनुभव
  11. पद क्र.11: (i) पदवीधर  (ii) 05 वर्षे अनुभव
  12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मराठी  टंकलेखन 30 श.प्र.मि.
  14. पद क्र.14: तारतंत्री प्रमाणपत्र
  15. पद क्र.15: (i) 04थी उत्तीर्ण    (ii) 02 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16: समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी
  17. पद क्र.17: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.
  18. पद क्र.18: भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी
  19. पद क्र.19: 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र
  20. पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 01 वर्ष अनुभव
  21. पद क्र.21: पदवीधर
  22. पद क्र.22: (i) B.Com  (ii) 03 वर्षे अनुभव
  23. पद क्र.23: कृषी पदवी किंवा समतुल्य
  24. पद क्र.24: विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी
  25. पद क्र.25: (i) 50% गुणांसह  B.A/B.Sc/B.Com   (ii) B.Ed    (iii) 03 वर्षे अनुभव
  26. पद क्र.26: विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी.
  27. पद क्र.27: 10वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी
  28. पद क्र.28: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.

जिल्हानिहाय पद संख्या: 

अ.क्र.जिल्हा पद संख्या अ.क्र. जिल्हा पद संख्या
1अहमदनगर93718नांदेड628
2अकोला28419नंदुरबार475
3अमरावती65320नाशिक1038
4छ. संभाजी नगर (औरंगाबाद)43221उस्मानाबाद453
5बीड56822पालघर991
6भंडारा32023परभणी301
7बुलढाणा49924पुणे1000
8चंद्रपूर51925रायगड840
9धुळे35226रत्नागिरी715
10गडचिरोली58127सांगली754
11गोंदिया33928सातारा972
12हिंगोली20429सिंधुदुर्ग334
13जालना46730सोलापूर674
14जळगाव62631ठाणे255
15कोल्हापूर72832वर्धा371
16लातूर47633वाशिम242
17नागपूर55734यवतमाळ875

वयाची अट: 25 ऑगस्ट 2023 रोजी,  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  1. आरोग्य सेवक (महिला): 18 ते 42 वर्षे
  2. आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे
  3. आरोग्य सेवक (पुरुष): 18 ते 47 वर्षे
  4. पर्यवेक्षिका: 21 ते 40 वर्षे
  5. उर्वरित इतर पदे: 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2023 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online