राज्यशासनाच्या पंचायत समिती विभागाकडून राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. ज्यामध्ये कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला व बालकल्याण विभाग, समाजकल्याण विभाग इत्यादींचा समावेश आहे. याअंतर्गत महिलांना, शेतकऱ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना विविध आर्थिक मदत व उपकरण वाटप करण्यात येतात. पंचायत समिती योजनाबद्दल खूपच कमी नागरिकांना माहिती असते, त्यामुळे या लेखाच्या माध्यमातून आपण पंचायत समिती योजनाची यादी (List) पाहणार आहोत, ज्यांतर्गत विविध योजना राबविण्यात येतात.
Panchayat Samiti Yojana 2023 | पंचायत समिती योजना
राज्य व केंद्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. ज्यामध्ये शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांचा समावेश असतो; परंतु काही योजना सर्व समावेशक नसतात, ज्यामुळे नागरिकांना संबंधित योजनांचा लाभ मिळत नाही. हीच बाब लक्षात घेता शासनाच्या स्थानिक विभागाकडून योजना राबविण्यात याव्यात यासाठी महाराष्ट्रात पंचायत समिती योजना सुरू करण्यात आल्या.
पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकरी वर्गांपासून महिलांनपर्येंत विविध अशा योजना राबविण्यात येतात, ज्याअंतर्गत त्यांना साहित्य/उपकरण वाटप, मानधन इत्यादी देण्यात येतं. विविध जिल्ह्यातील पंचायतीसाठी आवश्यकतेनुसार योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे.
Panchayat Samiti Yojana Overview
योजना संपूर्ण नाव | पंचायत समिती योजना |
राबविणार राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी वर्ग | शेतकरी, महिला, अपंग, विद्यार्थी |
लाभ स्वरूप | साहित्य वाटप |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
पंचायत समिती कृषी विभाग योजना
- 75 % अनुदानावर इलेक्ट्रिक मोटार संच
- 75 % अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र
- 75 % अनुदानावर प्लास्टिक क्रेटस.(क्षमता – २० किलो)
- 75 % अनुदानावर ताडपत्री (प्लास्टिक ६*६ मीटर 370 gsm.)
- 75 % अनुदानावर सिंचनासाठी PVC पाईप/HDPE पाईप
- 75 % अनुदानावर पीक संरक्षण /तणनाशक औषधे-कीटकनाशक व बुरशीनाशक औषधे
पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग योजना
- पशुपालकांना एक सिंगल फेज 2 HP कडबाकुट्टी इलेक्ट्रिक मोटारसह (अनुदान 75 %)
- मिल्किंग मशिन : पशुपालकांना मिल्किंग मशिन (अनुदान 75 %) जास्तीत जास्त अनुदान मर्यादा 15,000 रुपयांपर्यंत असेल.
- कुक्कुटपालन (एक महिना वयाच्या कडकनाथ जातीच्या पक्ष्यांना 50 पिल्लांचा 1 गट) (अनुदान 75 %)
- मैत्रीण योजना : मैत्रिणी योजनेअंतर्गत महिलांना 50 ते 75 टक्के अनुदानावर 5 शेळ्यांचा गटवाटप करण्यात येतो.
महिला व बालकल्याण विभाग योजना
- ग्रामीण भागातील 18 वर्षे पूर्ण महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना मिळणेसाठी अनुदान (रु. 3000/-)
- मोफत पिठाची गिरणी : ग्रामीण भागातील महिलांना पीठ गिरणी पुरविणे
- शिलाई मशीन योजना : ग्रामीण भागातील महिलांना शिलाई मशिन पुरविणे
- इयत्ता 7 वी ते 12 वी पास मुलीना संगणक प्रशिक्षण देणे
- MS-CIT पुर्ण करणाऱ्या मुलीना 3500/- रु.लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल)
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्र
- जातीचा दाखला
- आधारकार्ड
- रहिवाशी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- लाईट बिल
- अनुभव प्रमाणपत्र (शिवणकाम)
- बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- शासकीय नोकरी नाही व लाभ घेतला नाही याचे हमीपत्र
Panchayat Samiti Yojana Online Application
महाराष्ट्रातील पंचायत समिती विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या जवळपास सर्व योजना ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येतात; परंतु कधीकधी गुगल फॉर्मच्या माध्यमातून किंवा शासनाच्या इतर अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून संबंधित विभागाकडून Online अर्ज मागविण्यात येतात. सध्यास्थितीत सदरच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत का ? याची खात्री करून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या पंचायत समिती कार्यालयाला भेट देऊन चौकशी करावी लागेल.
पंचायत समिती योजनांसाठी अर्ज कुठे करावा ?
पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी नागरिकांना, पशुपालकांना, शेतकऱ्यांना व महिलांना त्यांच्या जिल्ह्यातील संबंधित पंचायत समिती विभागाला संपर्क साधावा लागेल. त्यासोबतच इतर योजनांची माहिती घेऊन सदर योजना तुमच्या तालुक्यातील पंचायत समितीमार्फत सध्या चालू आहे का ? याची विचारपूस करून विविध योजनांचा लाभ पंचायत समिती विभागाकडून मिळवावा.
⭕ निष्कर्ष : पंचायत समितीकडून सुरू करण्यात आलेल्या विविध योजना नागरिकांसाठी खूपच लाभदायक आहेत; कारण नागरिकांना सर्व योजनांचा लाभ स्थानिक पातळीवर या योजनेच्या माध्यमातून दिला जातो, त्यामुळे नागरिकांना इतर सरकारी योजनांवर अवलंबून न राहता पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवता येतो.
पंचायत समितीच्या विविध योजना कोणत्या ?
पंचायत समितीमार्फत कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, समाज कल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध योजना राबविण्यात येतात.
पंचायत समिती योजनांसाठी अर्ज कुठे करावा ?
पंचायत समिती योजनाअंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना त्यांच्या संबंधित तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधावा लागेल.
पंचायत समितीच्या योजनांमधून कोणती उपकरण/साहित्य दिली जातात ?
पंचायत समिती योजनांमधून मुलींसाठी सायकल, महिलांसाठी शिलाई मशीन, अपंगांसाठी मिरची कांडप, शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी मशीन अशा विविध उपकरण/साहित्यांच वाटप करण्यात येत.
पंचायत समिती योजना कोण-कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात येतात ?
पंचायत समिती योजना राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये राबविण्यात येतात; परंतु यामध्ये काही ठिकाणी सर्व योजनांचा समावेश आहे, तर काही ठिकाणी काही योजना वगळण्यात आल्या आहेत. त्यासाठी तुम्हाला तुमच्या पंचायत समितीमध्ये उपलब्ध योजनांची माहिती मिळवावी लागेल.