मूल – दिनांक १५अॉगस्ट २०२३ रोज मंगळवारला मोंटफोर्ट कृती विकास विद्यालय नलेश्वर मध्ये ७७ वा स्वातंत्र्य दिन तसेच वृक्षारोपण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रीतीताई अलेक्झांडर ,वर्ल्ड ऑफ गॉड सी. सी .सी सोसायटी बल्लारपूर ,प्रमुख पाहुणे सौ .मनीषाताई तावडे सरपंच ग्रा. पं. नलेश्वर, मा.दिनेश कुळमेथे तंटामुक्ती अध्यक्ष नलेश्वर , मा. अशोक वाळके पो. पाटील नलेश्वर ,मा. मुख्याध्यापक भूपेंद्र मोटघरे सर मोंटफोर्ट कृती विकास विद्यालय नलेश्वर, गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालक वर्ग हे कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संगीत ,भाषण ,नृत्य,
देशभक्ती गीता द्वारे विद्यार्थ्यांचे मनोरंजन व देशभक्ती जागृत करण्या आली. दहावी बोर्ड परीक्षेत प्रथम तथा द्वितीय प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शील्ड देऊन सत्कार करण्यात आले.मान्यवरांनी भाषणातुन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.उषा कुळमेथे मॅडम व श्री पंकज जाधव सर यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Home आपला जिल्हा Breaking News मोंटफोर्ट कृती विकास विद्यालय नलेश्वर मध्ये स्वातंत्र्य दिन व वृक्षारोपण सोहळा उत्साहात...