‘माझी माती- माझा देश’ अभियान येथील पंचायत समिती मूल मधून कलश दिंडी

63

केंद्र सरकारचे ‘माझी माती- माझा देश’ अभियान येथील पंचायत समिती कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे. प्रत्येक गावातील माती कलश चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यक्रमाला चंद्रपूर पाठविण्यात आले . 

आज दिनांक 22/08/2023 रोजी 5 वाजताच्या सुमारासपंचायत समिती मूल मधून कलश दिंडी काढण्यात आलीे त्यांनतर तहसील कार्यालयातील 75 फुड उंच झेडांच्या खाली सर्व उपस्थितीना महाराष्ट्र गीत गायन,वंदन करण्यात आले.
कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम,तहसिलदार डॉ.रविंन्द्र होळी तसेच नायब तहसीलदार ओंकार ठाकरे,नंदकिशोर ​कुभारे व इतर कर्मचारी,अनेक विभागतील कर्मचारी,महिला कर्मचारी,मनेरगा कर्मचारी, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य,विविध विभागातील कर्मचारी,नागरीक, विद्यार्थी विद्र्याीनी उपस्थित होते.

या अभियानांतर्गत तालुक्यातील शाळा, ग्रामपंचायतीत शिलाफलकाची उभारणी करण्यात येत असून, शिलाफलकावर आजादी का अमृतमहोत्सवाचा लोगो, पंतप्रधान मोदींच्या व्हीजन २०४७ संदेश, स्थानिक शहीद वीरांची नावे आदी नमूद करण्यात येत आहे.

शिवाय वसुधा वंदन, स्वातंत्र्यसैनिक व वीरांना वंदन, पंचप्रण शपथ घेण्यात आली. प्रत्येक गावातील आणलेली माती एका कलशामध्ये गोळा करून ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा व राज्याचे नाव पेंटींग करून हा कलश २७ ते ३० ऑगस्टदरम्यान पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे घेऊन जाणार आहे.

 तालुका स्तरावर अमृतसरोवर शाळा, पंचायत समिती, ग्रामपंचायत या ठिकाणी कार्यक्रम घेऊन राष्ट्रगीत गायन राबविण्यात येत आहे.

प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालयांमार्फत प्रभातफेरी, रांगोळी, चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार असून, ग्रामपंचायत स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समन्वयाने आरोग्य तपासणी शिबिर घेतले जात आहेत.

सर्व शासकीय कार्यालय साफसफाई मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची विविध माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी गावात दवंडी, बैठका व सादरीकरण उपक्रम राबविण्यात येत आहेत.

ग्रामपंचायत, पंचायत समितीस्तरावर लेखाशक निपटारा मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पंचायत समितीचे