मुल :— राष्टवादी कॉंग्रसेचे ज्येष्ठ नेते, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषदचे राष्टीय अध्यक्ष मान.छगनरावजी भुजबळ यांच्यावर हल्ला करणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ, अशी घोषणा करणाऱ्या विश्वजीत देशपांडेवर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करा अशी मागणी महात्मा फुले समता परीषद चंद्रपूर पूर्व यांचे वतीने पोलीस निरीक्षक सुमीत परतेकी यांना देशपांडे वर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
मान. भुजबळ साहेब हे समता परीषदेचे माध्यमातून देशामध्ये पुरोगामी विचारसरणीची चळवळ घेऊन काम करीत आहेत. ओबीसी व बहूजनाच्या न्याय हक्कासाठी ते सदैव झटत असतात भुजबळ साहेब हे कॉम्बीनेट मंत्री व प्रतिष्ठीत व्यक्ती महत्व असून त्यांच्यावर हल्ला करण्यास प्रवृत्त करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्याचा व समाजात वाद निर्माण करण्याचा दुष्ट हेतू ठेवून विश्जीत देशपांडे यांनी भुजबळांवर हल्ला करण्याचे आवाहन केलेले आहे. हे लोकशाही ला अभिपेत नाही विचारांची लढाई विचारांनी लढावी या करीता देशपांडे वर गुन्हा दाखल करून अटक करण्यात
यावी या करीता मुल पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांना निवेदन देताना अ. भा. महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले,समता परीषदेचे जिल्हा सल्लागार,माजी जी.प.सदस्य प्रा. रामभाऊ महाडोरे, महिला जिल्हा कार्याध्यक्ष शशिकला गावतुरे, माळी महासंघाचे विभागीय महासचिव तथा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, माळी महासंघाचे प्रा. सुधीर नागोशे शहर अध्यक्ष राकेश मोहुर्ल, चिमढा सरपंच कालिदास खोब्रागडे, उपसरपंच योगेश लेनगुरे,चिरोली माजी सरपंच अनिल शेंडे, जिल्हा सहसचिव ईश्वर लोनबले, जिल्हाप्रतिनिधी कैलास चलाख, समता परीषदेचे रोहित निकुरे, मनीष मोहर्ले, परशुराम शेंडे, प्रा. प्रभाकर धोटे,विनोद आंबडकर,श्रीकृश्ण शेंन्डे ,मनिष शेंन्डे, प्रा.नीरज चन्ने, प्रा.पुरुषोत्तम कुंनघाडकर,विनोद आंबटकर, प्रा.विजय काटकर, प्रा.चक्रधर घोंगडे, समता परीषद पदाधिकारी दुशांत महाडोरे, श्रीकृष्ण शेंडे, ,प्रा. दिलीप वारजूरकर ,भाऊजी लेंनगूरे, समता परिषदेचे महिला पदाधिकारी सौ. सीमा लोनबले,सौ.वैशाली मशाखेत्री, सौ.स्मिता गुरूनुले, सौ.उषा चुदरी, सौ.दर्शना निकुरे, देवराव ढवस्, दलीत जंनबंधू,सुभाष वाढई,प्रभाकर चौधरी,सुभाश गुरूनूले, समता परिषदेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.