कृषी महाविद्यालय मूल अंतर्गत शेतकरी शास्रज्ञ मंचाची आठवी बैठक दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोजी दहेगाव त. मूल येथील शेतकरी विजय गुरनुले यांच्या शेत बांधावर संपन्न झाली . या प्रसंगी कृषी महाविद्यालय, मूल चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. एस. टेकाळे, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष मा. विजय गुरनुले, शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मूल येश्रील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यत्वेकरून “खरीप पिकावरील किड व रोगाचे व्यवस्थापन” या विषयावर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत टेकाळे यांनी शेतकऱ्यांनी नेहमीच आपली पिकांचे निरीक्षण करत राहावे कारण बदलत्या हवामानामुळे पिकांवर विविध प्रकारची कीड व रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो असे सांगितले. शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार कीड व रोग व्यवस्थापनेबाबत तात्काळ उपाय योजनेचा अवलंब करावा असे या प्रसंगी सांगितले.
तसेच विद्यापीठाद्वारे विकसित तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले. विषयतज्ञ (कृषी विद्या) डॉ. विजय राऊत यांनी धान पीकातील खत, पाणी ब तण व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती दिली. किटकशास्त्रज्ञ डॉ. अर्चना बोरकर यांनी धान पिकावर येणाऱ्या विविध किडी व त्यांचे व्यवस्थापन यावद्दल सविस्तर माहिती दिली.
नुकसानदायक किडींची ओळख पटल्यानंतरच त्या किडीचे योग्य वेळेत योग्य नियंत्रण करावे तसेच रासायनिक किटकनाशकांचा वापर कमी करत जैविक किटकनाशकांचा वापर अधिक करावा असे मार्गदर्शन त्यांनी केले. वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. प्रवीणा बरडे यांनी धान पिकातील रोग ब्यवस्थापनाबद्दल सांगतांना बीजप्रक्रिया करणे किती महत्वाचे आहे हे पटवून दिले.
धान पिकावरील रोग जसे करपा, कडा करपा, काजळी व रोगावाबत व त्यांच्या नियंत्रणाबाबत उपाययोजनावावत मार्गदर्शन केले.
धान पिकाची प्रत्यक्ष पाहणी अंती करपा रोगाचे लक्षण दिसून आले व त्यावर डॉ. बरडे ह्यांनी उपाययोजना सुचविल्या, तसेच त्यांनी ट्रायकोडरमा द्या जैवबुरशीनाशकाच्या वापर करण्यावर भर दिला. वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. दिनेश नवलकर यांनी कारले व धान पिकातील अन्नद्रव्य कमतरतेवर उपाय सुचविले. सदर कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. दिनेश नवलकर यांनी उपस्थितांचे आभार, मानुन कार्यक्रमाची सांगता केली.