चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील अग्रणी पतसंस्था म्हणून उदयास येत असणारी मूल तालुक्यातील प्रथम पतसंस्था धनश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (नोंदणी क्रमांक हि.एच.डी./मूल/आर.एस.आर./४०२/१९९०) ची ३३वी आमसभा आज दिनांक २७/०८/२०२३ रोजी दुपारी संस्थेच्या इमारतीच्या भव्य सभागृहात (केशवराव हेडगेवार सभागृह, नागपूर रोड मूल )पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष अजय गोगूलवार होते तर व्यासपीठावर संस्थेचे कार्यकारी मंडळ उपस्थित होते.
संस्थेच्या व्याहाड शाखेचे व्यवस्थापक प्रकाश लाटकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तर मुख्य कार्यकारी अधिकारी रामभाऊ महाडोरे यांनी प्रास्ताविक व अहवाल वाचन केले व उपस्थित सभासदांची मंजुरी मिळवली.ज्यांत संस्थेच्या २०२२-२३या आर्थिक वर्षात संस्थेचा निव्वळ नफा ,४०,०६,०३६.६२/- एवढा असून त्या नफ्याच्या नियोजन व लाभांश वाटपास दिनांक १६/०७/२०२३च्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे.
संस्थेच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेताना आपण कार्यभार स्वीकारण्यापूर्वी २५वर्षात असणारी संस्थेची आर्थिक, सामाजिक आणि शाखा निहाय व कार्यक्षेत्रातील प्रगती व आपण कार्यभार स्वीकारल्यानंतर झालेल्या प्रगतीच्या कार्याचा लेखाजोखा उपस्थित सदस्यांमध्ये मांडतांना अध्यक्ष अजय गोगूलवार यांनी आपल्या कार्याची आणि संचालक मंडळाच्या सहकार्याची विण, विचार आणि कार्यक्षमता मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
परिसरात पतसंस्था व इतर आर्थिक संस्थांना उधाण आले असताना आपल्या संस्थेचा प्रगतीचा आलेख कसा उंचावत आहे तो कसा उंचावत राहिल यासाठी आपण केलेल्या नियोजनबद्ध कार्यक्रमाकरीता सगळ्यांनी आपली संस्था म्हणून सहकार्य दिले आहे आणि आज नंतरही असेच सहकार्य मिळत राहील ही अपेक्षा व्यक्त केली.
आमसभेत मूल,सावली ,व चिचपल्ली शाखेतील कार्यरत व लाभधारक खातेदार, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजवर १०००च्या जवळपास असणारी सभासद संख्या व ८.५करोड असणाऱ्या ठेवी आजमितीस संस्थेचे १०३५०सभासद असल्याची बाब व ठेवी तिपटिहून अधिक झाल्याची बाब यानिमित्ताने सभासदांना प्रथमच माहिती झाली ,आणि जूने संचालक मंडळ बदलून नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्याची बाबही आजच बऱ्याच सभासदांना प्रथमच माहिती झाली.
संस्थेच्या उभारणीत सहकार्य करणाऱ्या छोट्या भागधारकांना मात्र आपले भागभांडवल वाढवावे लागणार अन्यथा त्यांच्यावर कार्यवाहीची टांगती तलवार असल्याची बाब संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या अहवाल वाचनात प्रामुख्याने नमूद केले आहे. एकुण संस्था प्रगतीचा नवनवीन उच्चांक गाठत असतांनाच संस्था उभारणीचा पाया रचण्यात सहकार्य करणाऱ्या सभासदांना आपले सदस्यत्व टिकविण्यासाठी आता तडजोड करणे आणि संस्थेत बचत खाते उघडत आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे, हे विशेष.