मूल :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका शाखा मूल चीविशेष बैठक नागपूर विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांच्या उपस्थितीत इको पार्क येथे संपन्न झाली.सर्वप्रथम उपस्थित सदस्यानी प्रा.महेश पानसे यांचे स्वागत केले.तालुका कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.
दै.महासागर चे तालुका प्रतिनिधी सतीश राजुरवार यांची व उपाध्यक्षपदी नितेश मॅकलवार एस.के 24 तास उपसंपादक सर्वानुमते पत्रकार राजेंद्र वाढई,संघटकपदी दै.युवराष्ट्र दर्शन चे तालुका प्रतिनिधी धर्मेश सूत्रपवार तर संदीप तेलंग यांची तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली.मूल येथील जेष्ट पत्रकार मनिष रक्षमवार यांना सर्वानुमते जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून नामनिर्देशीत करण्यात आले .
सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचा नागपूर विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांचे हस्ते यावेळी गौरव करण्यात आला.तालुका कार्यकारिणीची निवडीनंतर भविष्यात तालुका शाखेची वाट चालव संघटनेचे उदिष्ट पार पाडणयाकरीता करण्यासंबंधाने प्रा.महेश पानसे यांनी मार्गदर्शन केले महाराष्ट्र,गोवा,गुजरात, कर्नाटक,दिल्ली या राज्यात विस्तारलेल्या राज्य पत्रकार संघात पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचा
निर्धार यावेळी नवनियुक्त पदाधिकारी यांनी व्यक्त केला.मुल तालुक्यातील संघटनेचे सारे अधिकुत सदस्य यावेळी उपस्थित होते.