राजोली येथे लसीकरण शिबिर

70

जनावरांसाठी राजोली  येथे लसीकरण शिबिर

मूल: मूल येथील कृषी महाविद्यालयात अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राजोली येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव या कार्यक्रमांतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना व राजोली ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांचेलसीकरण शिबिर घेण्यात आले.

यामध्ये जनावरांमध्ये होणारे विविध आजार याविषयी मार्गदर्शन करून जनावरांना लम्पी आजारावरील रोग प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्या. तसेच शेतकऱ्यांना जनावरांच्याआजाराविषयी सर्व कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी कृषी महाविद्यालय मूलचे पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. खुशाल राठोड, राजोली येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्लता बशेट्टी, बबन रंगारी, सरपंच जितेंद्र लोणारे उपस्थित होते. हा उपक्रम डॉ. विष्णुकांत टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.