जानाळा येथील शिबिरात ९० जणांची तपासणी

47

मूल गावातील नागरिकांना त्यांच्या गावातच मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उदात्त हेतूने जिल्हा आरोग्य विभाग व टाटा ट्रस्ट चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मूल तालुक्यातील जानाळा उपकेंद्रामध्ये शुक्रवारी मोफत आरोग्य शिबिर पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन जानाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच दर्शना राजेंद्र किन्नाके यांच्या हस्ते पार पडले. यावेळी डॉ. सूरज साळुंखे, डॉ. ट्विंकल ठेंगळे, डॉ. समता लिंगायत यांनी आलेल्या एकूण ९० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली. यामध्ये शुगर, बीपी, रक्ताच्या चाचण्या, मुखविकार, स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, गरोदर मातांची तपासणी, वयोवृद्धांची तपासणी करून मोफत औषधाचे वितरण केले. यावेळी शिबिराला सचिव धीरजकुमार बोरकर, ग्रामपंचायत सदस्य बापूजी मडावी, सदस्य शालू कुंभरे, नीता निकोडे, शिक्षक भूषण काळे, अर्चना भातुरकर, वैशाली सहारे, कालीचरण रामटेके, जीवन लेनगुरे उपस्थित होते.