मुल: ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत सिंदेवाही तालुक्यात लोनवाही येथे चारा प्रक्रिये बद्दल प्रात्यक्षिकाचे सादरीकरण मुल येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषि कन्यांनी केले. याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांना चारा उपचारा बद्दल माहिती दिली. उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईमुळे हिरवा चारा मिळत नाही. अशा वेळी जनावरांना वाळलेल्या चाऱ्यावर अवलंबून राहावे लागते. पशुपालक जनावरांच्या आहारात दुय्यम घटकांचा (उदा. गव्हाचा पेंढा, भात पेंढा) जास्त वापर करतात. त्यामुळे आहाराची पौष्टिकता वाढवण्यासाठी युरिया प्रक्रिया महत्त्वाची ठरते.
युरियाच्या वापरातून चारा पिकावर उपचार करण्याच्या प्रात्यक्षिकात दोन लिटर पाण्यात २५० ग्रा. गूळ, ५० ग्रा. मीठ व १५० ग्रा. युरिया एकजीव करून पाच किलो वाळलेला चारा वर शिंपडून त्याचे मिश्रण केले आणि हा चारा २१ दिवसांनी गुरांना खायला देण्याचा सल्ला कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना दिला. हे प्रात्यक्षिक योग्य रीतीने पार पाडण्याकरीता कृषीकन्यांनी कार्यक्रम अधिकारी डॉ खुशाल राठोड, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र या विषयाचे विषयतज्ञ यांची मदत घेतली.यावेळी शेतकरी ओमप्रकाश बोरकर व इतर गावकरी उपस्थित होते.
हा उपक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ विष्णुकांत टेकाळे, कार्यक्रम अधिकारी डॉ खुशाल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी महाविद्यालय मुलच्या कृषिकन्या प्राची वानखेडे,मोनिका किन्हेकर, मृण्मयी निमसटकर, अंकिता चंदनखेडे,श्वेता वासेकर यांनी यांनी राबविला.
Home आपला जिल्हा Breaking News कृषि महाविद्यालय मुलच्या कृषि कन्यांद्वारे चारा प्रक्रियेचे प्रात्यक्षिक