मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात वाढ @विद्यार्थ्यांची परवड, १० पर्यंत मुदतवाढ

37

शैक्षणिक प्रवासात अघोषित अडथळे आल्याने बरेच जणांना ऐच्छिक शिक्षण घेता येत नाही. त्यासाठी अन्य विद्यापीठ व व्यावसायिक संस्थेतील समकक्षता असलेले शिक्षण मुक्त विद्यापीठातून घेता येते. त्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून अनेकजण आपले पदवी व पदव्युत्तर शिक्षणाचे स्वप्न साकार करतात. परंतु यंदा मुक्त विद्यापीठाने परीक्षा शुल्कात भरमसाठ वाढ केल्यामुळे गोरगरिबांची परवड होत आहे.
परीक्षा शुल्काचा प्रवेश प्रक्रियेवर विपरीत परिणाम दिसून येत आहे. यंदा पदवी प्रवेशाची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट निश्चित करण्यात आली होती. प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने प्रवेश निश्चित होऊ शकले नाहीत. त्यामुळे प्रवेशासाठी १० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. वाढलेल्या प्रवेश शुल्कात कपात करण्यात यावी, अन्यथा टप्प्याटप्प्यात परीक्षा शुल्क आकारण्यात यावे, अशी मागणी इच्छुक विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
असे वाढले
परीक्षा शुल्क
सन २०२२-२३ व २०२३-२४ मध्ये बी. ए., बी. कॉम. अभ्यासक्रमाच्या फरकाची रक्कम प्रथम वर्ष १७०० (३०००), द्वितीय वर्ष २५०० (३७००), तर तृतीय वर्ष २८०० (४०००) असे आहे. एम.ए. इंग्रजी अभ्यासक्रमाचे ४२०० हून ७०००, एम. ए. मराठी ५२०० हून ७००० रुपये शुल्क करण्यात आले.