कृषि महाविद्यालय मुलच्या कृषी कन्यांनी दिले शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक : कीटकनाशकांची व तणनाशकांची फवारणी करताना योग्य ती काळजी घ्यावी!_`*
*_यवतमाळ येथील कीटकनाशक फवारणीच्या वेळी झालेल्या विषबाधेची पुनरावृत्ती राज्यात पुन्हा होऊ नये
यासाठी हे प्रात्यक्षिक देण्यात आले_*
मुल: ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत सिंदेवाही तालुक्यात लोनवाही येथे कीटकनशकांची किंवा तणनाशकांची फवारणी करताना कोण कोणती काळजी बाळगायची याचे सादरीकरण कृषी महाविद्यालय मुल येथील कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना दिले.
याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांना , फवारणी करतांना कोणती काळजी घ्यावयाची याबद्दल प्रात्यक्षिक दिले.
शेतकऱ्यांना काय सांगीतले?
धानपिकावरील कीडींचा नायनाट करण्यासाठी शेतकरी कीटकनाशक फवारणी करीत आहेत.फवारणी करताना सुरक्षित कीटचा वापर करावा. शेतकऱ्यांनी अंगावर कीटकनाशक उडणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशकावरील लेबल व माहिती पूर्णपणे वाचून सूचनांचे पालन करावे. डब्यावरील लाल रंगाचे पतंगीचा आकाराचे चिन्ह असलेली कीटकनाशके सर्वात विषारी त्यानंतर पिवळा, निळा, हिरवा असा क्रम लागतो.हिरव्या रंगाचे चिन्ह असलेली कीटकनाशके कमीत-कमी विषारी असतात. शेतकऱ्यांनी तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीटकनाशक फवारणीसाठी वापरू नये. फवारणी करताना मोजे, पायमोजे, चष्मा व सेफ्टी किट वापरावी. चेहरा नीट बांधून हवेच्या प्रवाहाच्या दिशेचा आधी अंदाज घेत प्रवाह मंद असतानाच फवारणी करावी. फवारणीनंतर स्वच्छ आंघोळ करुन वापरलेले कपडे धुऊन टाकावेत. वापरलेले स्प्रे, टाकी, बकेट स्वच्छ धुवावे.फवारणी केलेल्या शेतात मनुष्य अथवा जनावरांस चरण्यास प्रवेश करू देऊ नये. कीटकनाशकांचे डबे पुन्हा न वापरता ते खोल खड्ड्यात पुरून टाकावे. तंबाखू, खर्रा खाण्याचे शक्यतो टाळावे. अशा प्रकारची काळजी घेतल्यास कोणताही धोका न होता फवारणी परिणामकारक होईल असे मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले.हा उपक्रम योग्य रीतीने पार पाडण्याकरिता कृषी कन्यांनी डॉ अर्चना बोरकर व डॉ प्रविणा बरडे यांची मदत घेतली.
हा उपक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ विष्णुकांत टेकाळे,
कार्यक्रम अधिकारी डॉ खुशाल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी महाविद्यालय मुल येथे सातव्या सत्रात शिकत असलेल्या कृषीकन्या प्राची वानखेडे, मोनिका कीन्हेकर, मृण्मयी निमसत्कर, अंकीता
चंदनखेडे, स्वेता वासेकार यांनी यांनी राबविला.