चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले

60

चंद्रपूर, ७ सप्टेंबर २०२३: चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कळमना उपविभागात गुरुवार ७ सप्टेंबर रोजी वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे. बछडयांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

वनविभागाचे काही कर्मचारी गस्तीवर असताना कळमना उपप्रदेशातील कम्पार्टमेंट क्रमांक ५७२ मध्ये त्यांना अपंग वाघाचे बछडे दिसले. वन कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांची सुटका करून प्राथमिक उपचारासाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वन्यजीव उपचार केंद्रात पाठवले.

त्यानंतर त्या ठिकाणी अधिक शोध घेतला असता काही अंतरावर जवानांना वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले. सविस्तर पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. आता शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. शवविच्छेदन करणाऱ्या टीममध्ये डॉ. कुंदन पोडचेलवार आणि डॉ. दिलीप जांभुळे यांचा समावेश होता.

चंद्रपूर जिल्ह्यात वाढलेल्या वाघांच्या संख्येमुळे शेकडो नागरिकांना जीव गेला आणि दुसरीकडेच या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे वाघाचे देखील जीव जात आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये वाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. यामध्ये शिकार, विषबाधा, रेल्वे अपघात आणि इतर कारणे आहेत.

वनविभागाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.