कुठे जंगलात किंवा भरपूर झाडंझुडुपं असलेल्या भागात आपण फिरायला गेलो की इथं कुठे साप तर नाही ना, अशी भीती आपल्या मनात कायम असते. पण विचार करा हा साप कोणत्या जंगलात नाही तर तुम्ही नेहमी फिरत असलेल्या रस्त्यावर आढळला तर किंबहुना मूल तालुक्यातील चिरोली कवडपेठ रोड जवळ असलेल्या तलावात तीन दिवसा पासून एक आठ फुटाचा अजगर साप मासेमारी करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकला होता.तो जितका स्वतःला सोडविण्याचा प्रयत्न करीत होता तितका अधीक जाळ्यात गूरफटला जात होता. स्थानिक लोकांना ही बाब तीन दिवसा आधीच माहित झाली होती. परंतु इतक्या मोठ्या सापाला जाळ्यातून सोडवायचे कसे या विवंचनेत स्थानिक होते.
गावातील काही लोकांनी ही माहिती वनरक्षक रोगे व वनरक्षक राकेश गुरनूले यांना दिली. वनरक्षक राकेश गुरनूले यांनी मूल येथील सर्पमित्र उमेशसिंह झिरे व तन्मयसिंह झिरे यांना त्या अजगराला जाळ्यातुन सोडवून सुरक्षीत ठिकाणी सोडण्याची विनंती केली. माहिती मिळताच भर पावसात सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले आणि ब्लेड च्या सहाय्याने जाळे कापुन तीन दिवसा पासून अडकलेल्या अजगराची सुखरुप सुटका केली आणि त्याला जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.एरव्ही अजगर आपल्या मिठीत घेऊन माणसाला संपवू बघत असताना मूलच्या पितापुत्रांनी ह्या अजगराला जीवन दान दिले आणि ग्रामस्थांना ही दिलासा दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.