सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वार्ड. क्र. १ या नावाने १९१९ मध्ये वॉर्डातील लोकांनी उत्स्फूर्त गणेश मंडळाची स्थापना केली. तेंव्हा पासून सतत गणेशोत्सव सुरू असल्याचे येथील मूर्तिकार चंदू चेपाजी रामशेट्टीवार यांनी सांगितले.
मूल हे परिसरात बाहुली ची शिनशिनेरी करणारे प्रसिद्ध शहर आहे. मोठ्या प्रमाणात जिल्हा व जिल्ह्याबाहेरील भक्त प्रेक्षक बघण्यासाठी अक्षरशः रात्रोभर गर्दी असायची, वेगवेगळे मनोरंजनाची साधने गोंधळ, तमाशा, दंडार असे कार्यक्रम असायचे एक वेगळा आनंद मोहल्ल्यातील लोकामध्ये असायचा दरवर्षी रात्र रात्र जागून शिंशिनेरी बनवायची यात महादेव यात्रा, डोंगरगड, ज्ञानेश्वर चांगदेव भेट, देशात घडत असलेल्या सत्य घटनेवर आधारित पेंट्यागाणं वरील हमाला अशा वेगवेगळ्या प्रसिद्ध शिन असायच्या आता वेळ रात्रौ १०-०० वाजेपर्यंत असल्याने बघणाऱ्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे आवड कमी होत चालली, 123 वर्षे होत चालले मंडळाला माझे आजोबा बापूजी यांनी सुरुवात केली माझे वडील चेपाजी पेंटर हे येवढ्या परिसरात प्रसिद्ध पेंटर होते. त्यांचा वसा जोपासत तुळशीराम पेंटर आणि चंदू पेंटर यांचा वसा गणेश पेंटर आणि अक्षय पेंटर जोपासत आहेत.
गणेश विसर्जनाच्या दिवशी उत्सवाकरिता रात्रोभर परवानगी द्यावी असे अमाची शासनाकडे याचना असल्याचे मंडळातील गणेश भक्तांनी व्यक्त केली.
Home आपला जिल्हा Breaking News सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वार्ड. क्र. १ या नावाने १९१९ मध्ये वॉर्डातील लोकांनी...