मुल शहर वास्तव @सुशोभीकरणासाठी लाखोंचा खर्च; देखभालीकडे कोण पुरवेल लक्ष?

66

मुल नगर परिषदेने फिरवली पाठ : लाखो रुपये निधीचा चुराडा
 शहराचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला.  शहरातील रिकाम्या जागांवर पालिकेने  उद्याने तयार केली. मात्र, कोट्यवधी रुपये खर्चून तयार झालेल्या या उद्यानांच्या देखभालीकडे कुणाचेच लक्ष नाही. सुशोभीकरणाचा पार चुराडा झाला आहे.उद्यान पूर्ण झाल्यावर देखभाल- दुरुस्तीकडे नगर परिषद प्रशासनाने पाठ फिरवली आहे. शासनाने विकासकामांच्या देखभाल- दुरुस्तीसाठी लाखो रुपये निधी दिला. तरीही देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने हा निधी नेमका गेला तरी कुठे, अशा सवाल उपस्थित होत आहे. सुशोभीकरणाने खुललेल्या सौंदर्याला आता उदासीन धोरणामुळे डाग लागत आहे.
सौंदर्य हिरावले गेल्याने, आता या उद्यानांमध्ये कुणीही फिरकत नसल्याचे चित्र आहे. दूरवस्थेबाबत विचारणा व
तक्रार कुणाकडे करावी, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
सुशोभीकरणामुळे शहराचा चेहरा बदलला. परंतु, देखभालीकडे नगर परिषदेचे लक्ष नाही. वेळ घालवण्यासाठी या ठिकाणी बसावे म्हटल्यास बसू शकत नाही. उद्यानांमध्ये गवत व काटेरी झुडपे वाढलेली आहेत.प्रशासनाने शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी विकास आराखड्याअंतर्गत बरीचे कामे केली. परंतु, हीच विकासकामे आता शहराचे सौंदर्य हिरावत आहेत. नगर परिषदेचे दुर्लक्षच याला कारणीभूत आहे. असे मूल शहरातील नागरीकांना दिसून येत आहे.