29 सप्टेंबर रोजी @मूल नमूद तारखेप्रमाणे तालुकानिहाय होणार गणेश विसर्जन

63
नमूद तारखेप्रमाणे तालुकानिहाय होणार गणेश विसर्जन
चंद्रपूर, दि. 27 :जिल्ह्यात 19 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2023 या कालावधीत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेश उत्सवानिमित्त स्थापन करण्यात आलेल्या गणेशमूर्तींचे तालुकानिहाय विसर्जन होणार अाहे.
दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी चंद्रपूर शहर व बल्लारपूर येथे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होणार आहे. तसेच दि. 29 सप्टेंबर रोजी राजुरा, भद्रावती, ब्रह्मपुरी व मूल या ठिकाणी तर 30 सप्टेंबर रोजी वरोरा येथे गणेश विसर्जन होणार आहे. याबाबत नागरिकांनी नोंद घ्यावी व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.