तलाठी भरती 2023 उत्तरपत्रिका जाहीर, असे चेक करा

113

महसूल विभागा अंतर्गत तलाठी भरती प्रक्रिया 2023 करिता एकूण 4 हजार 644 तलाठी भरती साठी 26 जून 2023 रोजी जाहिरात प्रकाशित झाली होती. तलाठी भरती लेखी ऑनलाईन परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्हा केंद्रावर घेण्यात आली. उमेदवार तलाठी भरती लेखी परीक्षा उत्तरतालिकेच्या प्रतीक्षेत होते, त्या अनुसार उमेदवारांना सदर परीक्षेची उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तलाठी भरती ( Answer key ) उत्तरतालीका pdf येथे डाऊनलोड करा

तुमचे उत्तरे येथे तपासा

तलाठी भरती 2023 response sheet येथे पहा

Talathi Bharti 2023 Answer key उत्तरतालीका पुढील प्रमाणे डाऊनलोड करा

• सर्वप्रथम @mahabhumi.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर भेट द्या.

• पुढे स्क्रोल केल्यावर ‘तलाठी सरळसेवा भरती 2023’ या पर्यायावर क्लिक करा.

• त्यांनतर युजर आयडी आणि पासवर्ड नमूद करून लॉगिन करा.

• उत्तरतालिका डाऊनलोड करा आणि सेव्ह करा.

आज दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळ पर्यंत वरील ठिकाणी दिलेल्या अधिकृत संकेत स्थळावर तलाठी भरती 2023 उत्तरतालिका उपलब्ध होईल.

आक्षेप नोंदणी करिता सूचना

◾उमेदवारांना उपलब्ध करुन देणेत आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) चे अनुषंगाने ( प्रश्न चुकीचा असल्यास, प्रश्नाचे पर्याय चुकीचे असल्यास इ. बाबत आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदवू शकतात.

◾आक्षेप नोंदणी दि. 28 सप्टेंबर ते दि. 08 ऑक्टोंबर 2023 रोजी रात्री 11.55 या कालावधीत दरम्यान आहे .

सादर केलेल्या आक्षेप / हरकती बाबत TCS चे समितीकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

◾आक्षेप / हरकत योग्य असल्यास सदर प्रश्नाबाबत गुण देण्याबाबत धोरण निश्चित करुन देणेत येईल.

◾TCS कंपनीकडून आक्षेप / हरकत सादर करणेसाठी प्रति आक्षेप / हरकती करिता रक्कम 100/- रुपये इतकी फी आकारण्यात येईल.