तथागत भगवान बुद्धाच्या विचाराने प्रेरित होऊन वर्षावास निमित्ताने कवयित्री, लेखिका सोनाली रायपुरे-सहारे यांनी मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प केला.
साहित्य क्षेत्रात त्या सतत कार्यरत असतात. गडचिरोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील तसेच बौद्ध धम्माचे गाळे अभ्यासक व सक्रिय समाज कार्यकर्ते डॉ.एम. ए. रायपुरे, गडचिरोली यांच्या त्या मुलगी आहेत. सोनाली यांचे आतापर्यंत चार बुक प्रकाशित झालेले असून आपल्या साहित्यातून सतत त्या समाज प्रबोधन करीत असतात. तथागत भगवान बुद्धाच्या विचारातून प्रेरित होऊन, अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सर्वांना दुःखातून मुक्त करण्याकरिता ज्या दहा पारमिता दिल्या त्यातीलच “दान “ह्या पारमिता मधून प्रेरणा घेवून ५/१०/२३ गुरूवार ला वर्षावास निमित्ताने हा संकल्प केला. त्यांचे मूळ गाव गडचिरोली येथील येवली हे असून त्यांचे सासर वानडोंगरी नागपूर येथील आहे. सध्या त्या ब्रह्मपुरीला वास्तव्यास आहेत. दानाचे महत्त्व कळावे व मरणोत्तर आपल्या अवयवामुळे आपल्या समाजाला फायदा होईल व त्यातून प्रदूषण देखील टाळता येईल .शेवटी देह हा नश्वर आहे .ते कुणाच्या ना कुणाच्या उपयोगी पडून त्यांना जीवनदान मिळावे.हीच एक मनस्वी इच्छा बाळगून व हा दूरदृष्टी कोण ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला. या सुज्ञ निर्णययाकरिता त्यांचे कुटुंब, त्यांच्या माहेरकडील व सासरकडील मंडळींनी सर्वांनी सहकार्य केले. ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कामठी सर, डॉक्टर नागमोती सर ,डॉक्टर सुखदेवे मॅडम ,अंजिरा अंबिलदूके NCD समुपदेशक उपस्थित होते. त्यांनी घेतलेले या निर्णययामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात असून इतरांनाही प्रेरणादायी “अवयव दान” ही संकल्पना आहे.
Home आपला जिल्हा Breaking News कवयित्री, लेखिका सोनाली रायपुरे सहारे यांनी केला मरणोत्तर देहदानाचा संकल्प