रेशनकार्ड@दर महिन्याला धान्य उचला नाहीतर जाईल परत

90

रेशनकार्ड आहे, पण वापर नाही; मग होऊ शकते रद्द ,दर महिन्याला धान्य उचला नाहीतर जाईल परत
गरीब कुटुंबांना रेशन कार्डच्या आधारावर स्वस्त दरात धान्य मिळते. रेशन कार्ड बनवण्याची जबाबदारी राज्य सरकारांची आहे. त्याची यादी वेळोवेळी अपडेट करून, लोकांना स्वस्त दरात धान्य पुरवले जाते. विसंगती आढळल्यास, रेशन कार्डदेखील रद्द केले जाते. अनेक कारणांमुळे कार्ड रद्द होऊ शकतात. जर तुम्ही दीर्घकाळ अन्नधान्य घेण्यासाठी तुमचे रेशन कार्ड वापरले नाही, तर तुमचे कार्ड रद्द होऊ शकते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारक कुटुंबांना धान्य पुरवले जाते. अनेक वेळा या महिन्यातील रेशन पुढच्या महिन्यात लाभार्थी उचलतात. त्यामुळे मागच्या महिन्याचे रेशन शिल्लक आहे. ते परत कसे करायचे आणि लाभार्थ्यांना द्यायचे कसे? असे प्रश्न निर्माण होत होते. त्यामुळे या निर्णयात बदल केला असून, लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्यात त्यांचे रेशन उचलावे लागणार आहे. अन्यथा हे रेशन परत जाणार असून, पुढील महिन्यात ते मिळणार नाही. त्यामुळे रेशन मिळविण्यासाठी लाभार्थ्यांची जबाबदारी वाढली आहे. या नव्या निर्णयामुळे शिल्लक रेशनचा प्रश्न निकाली निघाला आहे.
शासनाचा लाभार्थ्यांसाठी असा आहे निर्णय
शासनाच्या नव्या निर्णयानुसार लाभार्थ्यांना त्या त्या महिन्यात रेशन घ्यावे लागणार आहे. दिलेल्या मुदतीत रेशन उचलले नाही तर ते पुढच्या महिन्यात मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्यात लाभार्थ्यांना त्यांचे रेशन उचलावे लागणार आहे.
शिल्लक धान्याचा प्रश्नही निकाली शासनाच्या नव्या निर्णयामुळे प्रत्येक महिन्यातील धान्याचा हिशेब लागेल. शिल्लक धान्याचा प्रश्न निकाली निघणार : असून, प्रशासनाचा ताण कमी होणार आहे. दुसऱ्या महिन्याच्या ७ तारखेपर्यंतची मुभा रद्द एकदा धान्य घेण्याचे चुकले, तरी पुढील सात तारखेपर्यंत मुदतीमुळे दोन वेळचे धान्य लाभार्थ्याला मिळत होते. मात्र शासनाने नवीन नियमात ७ तारखेपर्यंतची मुभाही रद्द केली आहे.
दर महिन्याला रेशन घ्या
प्रत्येक महिन्यात रेशन दुकानावर जाऊन त्यांच्यासाठी आलेले रेशन उचलून घ्यावे. मागील महिन्याचे रेशन पुढच्या महिन्यात मिळणार नाही. ओंकार ठाकरे ,नायब तहसिलदार मूल पुरवठा विभाग.