पीकविम्याच्या नुकसान भरपाईची नोंदणी, कशी कराल?कसा भराल फॉर्म?

58

पावसाचा खंड किंवा खंडानंतर अधिकच्या झालेल्या पावसामुळे पीकांचे नुकसान झाले असेल आता शेतकऱ्यांना घरबसल्या पीकविम्याच्या नुकसान भरपाईसाठी नोंदणी करता येते. शेतकऱ्यांना हंगामानुसार तर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळते.

अतिवृष्टी, पुर, अवकाळी, अवेळी पाऊस, काढणीआधी किंवा नंतर पिकाचे नुसान अशा कारणांसाठी पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते. तसेच यामध्ये तर २१ दिवसांचा पावासाचा खंड झाला असेल तर अग्रीम रक्कम मिळते.

पिकांचे नुकसान झाले असले तर शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत नुकसान भरपाईची नोंदणी करावी लागते. ही नोंदणी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरूनही करता येऊ शकते. यासाठी काय करायचे जाणून घेऊया…

पीक नुकसानासाठी केंद्र सरकारने सुरू केलेला क्रॉप इन्शुरन्स नावाच्या ॲप देण्यात आला आहे. हा ॲप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड केल्यानंतर पीक नुकसान भरपाईचा फॉर्म तुम्हाला भरता येईल. यासाठी तहसिलदार, जिल्हाधिकारी आणि विमा कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना गूगल प्ले स्टोअरवरून हा ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जात आहे.

कसा भराल फॉर्म?

१. सर्वप्रथम तुमच्या फोनमधील प्ले स्टोअरवर जाऊन Crop Insurance हा ॲप डाऊनलोड करा.

२. ॲप उघडल्यानंतर सुरूवातीला change the language हा पर्याय निवडून त्यावर तुमची मातृभाषा निवडा.

३. नोंदणी खात्याशिवाय म्हणजेच continue without login या पर्यायाची निवड करा.

४. त्यानंतर पीक नुकसान crop loss हा पर्याय निवडा

५. त्यानंतर crop Loss intimation म्हणजेच पीक नुकसान नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करून तुमचा मोबाईल नं टाका.

६. त्यानंतर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवलेल्या ओटीपीने मोबाईल क्रमांकाची पडताळणी करा

७. यानंतर खरीप हंगाम/ रब्बी हंगाम निवडून नुकसान भरपाईचे वर्ष व राज्य निवडा. यानंतर हिरव्या रंगात दिलेल्या सिलेक्ट पर्यायावर क्लिक करा.

८. विमा जर बँकेत भरलेला असेल तर बँक निवडा, सीएससी केंद्रामध्ये ( Csc Center ) भरलेला असेल तर सीएससी निवडा किंवा तुम्ही स्वतः भरलेला असेल तर फार्मर ऑनलाईन ( Farmer Online) हा पर्याय निवडा.

९. जर तुमच्याकडे विमा पॉलिसीचा नंबर असेल तर तो टाका अन्यथा दुसरा पर्याय ।Select other option) निवडा.

१०. आता पॉलिसी क्रमांक मिळवण्यासाठी तुमचा जिल्हा, तालुका, महसूल मंडळ, गाव, ग्रामपंचायत, पिकाचे नाव, गट क्रमांक व 8अ वरील खाते क्रमांक टाका व Done या बटणावर क्लिक करा.

११. आता यादीत दिसणाऱ्या अर्जातून ज्या पिकाचे नुकसान झाले असेल त्या पिकाची निवड करा.

१२. पिकांच्या नुकसानीची घटना नोंदविण्याकरिता घटनेचा प्रकार ( Type of Incidence ), दिनांक, सध्याची पिकाची स्थिती, नुकसान भरपाईची अंदाजे टक्केवारी, त्यानंतर फोटो आणि व्हिडिओ अपलोड करा.

१३. काळजीपूर्वक सर्व माहिती भरल्यानंतर खाली तुम्हाला सबमिट ( Submit )ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून पीक नुकसानीच्या पूर्व सिचनेचा डॉकेट आयडी मिळवा. Docket ID तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवरती sms द्वारे पाठवण्यात येईल.

पीक नुकसान भरपाईसाठी पिकाचे नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरपाईसाठी अर्ज करता येईल.