मूल @पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी बी. एच. राठोड,

90

मूलचे बिडीओ घूनवत यांची बदली तर नविन गट विकास अधिकारी राठोड रूजू

मूल तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी घूनवत यांची अमरावती जिल्ह्यात बदली झाली असून त्यांच्या जागी बी. एच. राठोड, यांची नियुक्ती करण्यात आली आहे.घूनवत हे दोन वर्षांपूर्वी मूल पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून रूजू झाले होते. त्यांचा कालावधी तीन वर्षाचा होता.त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील सहायक गट विकास अधिकारी, पंचायतसमिती, शहापूर,यांची मूल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.

शासन आदेश क्रमांकः मविसे-१०२२/प्र.क्र.२२१ (भाग-२)/२०२२/आस्था-३

श्री. बी. एच. राठोड,
सहायक गट विकास अधिकारी, पंचायत
समिती, शहापूर, जि. ठाणे

गट विकास अधिकारी, पंचायत
समिती, मुल, जि. चंद्रपूर
रिक्तपदी

 

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक २७९७/२०१५ मध्ये दि. ०४.०८.२०१७ रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ दाखल केली आहे. सदर याचिका अद्याप प्रलंबित आहे. सामान्य प्रशासन विभाग, कार्यासन- १६ ब यांच्या दि.०७.०५.२०२१ रोजीच्या शासन निर्णय प्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे आव्हान देण्यात आलेले असून त्यावरील अंतिम निर्णयाच्या अधिन राहून तदर्थ पदोन्नती देण्यात येत आहेत.
३.दिव्यांग अधिकाऱ्यांना गट-अ व गट-ब मधील पदांवर पदोन्नतीबाबत सामान्य 3/5/ यांनी दिनांक २०.०४.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सुचनांच्या अधिन राहून तदर्थ पदोन्नती देण्यात येत आहे.४.का-वरील अधिकाऱ्यांना गट विकास अधिकारी, गट-अ संवर्गात पुढील अटींच्या अधीन राहून तदर्थ पदोन्नती देण्यात येत आहे :-
अटी व शर्ती:४.१) वरील अधिकाऱ्यांना देण्यात येणारी गट विकास अधिकारी, गट-अ संवर्गातील तदर्थ पदोन्नती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधिन राहून देण्यात येत आहे.