नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा !
मूल : शहरातील विविध समस्यांचे निवेदन तयार करून नगर परिषदेच्या आवक-जावक विभागात दिल्यानंतर ४ ५ दिवसानंतर त्यावर कार्यवाहीसाठी वेळ लागत होता. त्यामुळे यावर पर्याय म्हणून नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार यशवंत पवार यांनी क्यूआर कोड हीनवीन कल्पना अंमलातआणली.
यातून नागरिकांच्यातक्रारींचा आता जलदगतीने निपटारा होणार आहे.
मूल शहराचा विस्तार वाढला. वॉर्डातील समस्या सोडविण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडे सक्षम यंत्रणा असावी लागते. नागरिक व सामाजिक संघटना शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी नगरपरिषदेला निवेदने देतात.निवेदनांची दखल घेण्यास विलंब होऊशकतो.तक्रारींची दखल न घेतल्याने नागरिकांत नगर प्रशासनाबाबत नाराजी निर्माण होते. हा प्रकारनागरिकांना टाळण्यासाठी काळानुसार तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय मुख्याधिकारी पवार यांनी घेतला. त्यातून क्यूआर कोडची संकल्पना साकारली. क्यूआर कोडच्या माध्यमातून केलेली तक्रार नगर परिषदेच्या तक्रार निवारण कक्षात जाते. या पूर्वी अशी व्यवस्था नगरपरिषदेने केली नव्हती. त्यामुळे उशिर व्हायचा.स्थापित कक्षात प्रभागनिहाय नोंद होऊन त्याचा निपटारा करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया जलद गतीची असल्याने नागरिकांच्या अडचणींचा निपटारा होईल. नागरिकांनी क्यूआर कोडचा वापर करण्याचे आवाहन नगर प्रशासनाने केले आहे.