अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ द्वारा संचालीत ग्रामगीता जीवन- विकास परीक्षा श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम , मोझरी येथे सुखदेव चौथाले यांना ग्रामगीताचार्य पदवीने सन्मानित केले आहे.अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ अंतर्गत ग्रामगीता जीवन विकास
परीक्षा विभागाने 2023 या वर्षात घेतलेल्या ग्रामगीताचार्य या परीक्षेत पदवी प्राप्त करणाऱ्या 30 महिला व पुरुषांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 55 व्या पुण्यतिथी महोत्सवात ग्रामगीताचार्य ही पदवी देऊन त्यांना प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. पदवीधारकांना ग्रामगीताचार्यांची पदवी, सुवर्ण पदक व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
30 महिला व पुरुषांना ग्रामगीताचार्य पदवी
पुण्यतिथी महोत्सवात पदवीदान समारंभ
या GramGeetacharya कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळाच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा बोंडे या होत्या, तर उद्घाटक श्री गुरुदेव सेवामंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मण गमे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपसर्वाधिकारी दामोदर पाटील, प्रचार प्रमुख प्रकाश वाघ, सरचिटणीस जनार्दन बोथे, परीक्षा विभागाचे अध्यक्ष गुलाब खवसे, महादेव राघोर्ते, विठ्ठल उमप, काशिनाथ फुटाणे, बाबाराव पाटील, पौर्णिमा सवाई, विजया दहेकर, शोभा कऊटकर, डॉ. पुरुषोत्तम पाळेकर, विलास साबळे, सूर्यप्रकाश जयस्वाल, दिलीप डाखरे, रामदास सदार, रामदास देशमुख, नीळकंठ कळंबे आदीमान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला पुष्पा बोंडे, प्रकाश वाघ, दामोदर पाटील, लक्ष्मण गमे व गुलाब खवसे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ताराचंद कंठाळे यांनी केले. संचालन ग्रामगीत परीक्षा विभाग सचिव गोपाल कडू यांनी केले तर आभार प्रदर्शन राधेश्याम निमजे यांनी केले.
*ग्रामगीताचार्य * पदवी समारंभ गुरुकुंज आश्रम मोझरी येथे संपन्न !!
चंद्रपुर जिल्हातील मुल शहरातील गुरुदेव सेवा मंडळ मुल जि चंद्रपुर येथील सक्रीय कार्यकर्ते मान.सुखदेव चौथाले सर, यांना अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ द्वारा संचालीत ग्रामगीता जीवन- विकास परीक्षा श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम , मोझरी येथे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवी सन 2023-24 या कार्यक्रमात “ग्रामगीताचार्य” ही परीक्षा ऊत्तीर्ण झाल्याबद्दल मान.पुष्पाताई बोंडे, मान.पाटील, मान.बंडोपंत बोढेकर,ग्रामगीताचार्य मान. गुलाबराव खवसे, मान.सवाई मॅडम,मान.दहीकरताई मान. जनार्दन बोथे, संस्थेचे अध्यक्ष वमान.गमे काका , सर्वाधिकारीयाचे प्रमुख ऊपस्थितीत पारपडला. कार्यक्रमाचे संचालन सचिव मान.गोपालजी कडुयांनी केले. महाराष्ट्रातील 30ग्रामगीताचार्य यांना हा पुरस्कार मोठ्या थाटामाटात देण्यात आला. चंद्रपुर जिल्ह्यातील यावेळी तीन व्यक्तींना ग्रामगीताचार्य पदवी सन्मानाने देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला असंख्य गुरुदेव भक्त प्रामुख्याने उपस्थित होते.यांच्या यशाबद्दल मित्रमंडळीनी अभिनंदन केलेले आहे. !! जयगुरु!!