नवभारत कर्मचारी सहकारी पतसंस्था च्या निवडणुकीमध्ये@सहकार विकास आघाडीचे दणदणीत विजय

106

मूल
नवभारत कर्मचारी सहकारी पतसंस्था च्या निवडणुकीमध्ये सहकार विकास आघाडीचे दणदणीत विजय.
१३ संचालक असलेल्या या पत संस्थेत महिला राखीव गटात सौ. उज्वला हांडेकर , व सौ. विभा वनकर या दोन उमेदवार बिनविरोध, इतर मागास गटात गुरुदास चौधरी, अनु.जमाती गटात रत्नपाल उईके, विमुक्त जाती/ विशेष मागास प्रवर्गात कार्तिक नंदूरकर, असे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले. मात्र सर्वसाधारण गटात आठ उमेदवार निवाडायचे होते परंतु या गटात सुरेश फुलझेले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली. यात सहकार विकास आघाडीचे प्रमुख किसन वसाडे, दिनेश जीड्डीवार, निवृत्तीनाथ शेंडे, धीरज नौकरकर, मिलिंद रामटेके, दिनेश बनकर, विकास मोडक, देविदास मशाखेत्री हे सहकार विकास पॅनल चे आठही उमेदवार विजयी झाले. आणि सुरेश फुलझेले यांचा २१ मतानी पराभव झाला. पार पडलेल्या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून आर. डी. कुमरे , केंद्राध्यक्ष जयंत दिवसे, मतदान अधिकारी, जुबेर शेख, व मेश्राम यांनी काम पाहिले , चोख पोलिस बंदोबस्तत अत्यंत शांततेत ही निवडणूक पार पडली. सर्व विजयी उमेदवाराचे संस्थेचे अध्यक्ष, ॲड.बाबासाहेब वासाडे, सचिव ॲड. अनिल वैरागडे , डॉ. राममोहन बोकरे, सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी अभिनंदन केले.!