पंचायत समिती मूल कडून फराळ, दिवणार, बांबू पासून तयार केलेले आकाश दिवे विक्री प्रदर्शनी

56

उमेद चे फराळ महोत्सव

महाराष्ट्र  राज्य ग्रामीण जीवनोन्नती  अभियान,  तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती MUL  येथे 

दिवाळीची चाहूल लागली की, मज्जाच मज्जा असते. फराळ म्हटला की चिवडा, चकली, लाडू ,करंज्या आल्याच! काही वर्षांपूर्वीपर्यंत या फराळाचं खूप अप्रूप असायचं. हल्ली मात्र चॉकलेट्स, कुकीज, पिझ्झा आणि बर्गर याची आवड दिसते. दिवाळीपासून थंडीची चाहूल लागते. वाढत्या गारव्यात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी शरीराला जास्तीच्या कॅलरीजची आवश्यक असल्याने या सणासाठी बनविल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये कॅलरी भरपूर असतात.

फराळाशिवाय दिवाळी हे समीकरण जुळतच नाहीकाहीसा गोड काहीसा तिखट व बराचसा खुसखुशीत ठेवा म्हणजे फराळ ! यास परंपरेला चालना देत

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत दिवाळी फराळ महोत्सव 2023 तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती मुल येथे दिनांक ६ ते ११ नोव्हेंबर २०२३ कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. उमेद अभियान नेहमी आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रम करिता चर्चेत असतो गत वर्षांपासून सुरु केलेल्या दिवाळी फराळ महोत्सवास देखील मुल वासियांनी खूप प्रतिसाद दिला.

गावातून येणारी ग्रामीण माहिलेचे उपजिविकेचे स्रोत वाढवून त्यांना सम्मानाने समाजात जगविणे त्यांची आर्थिक उन्नतीत भर घालणे याकरिता उमेद चे कर्मचारी नेहमी कार्य तत्पर असतात. अस्सल गावठी चव देण्याचा प्रयत्नं नेहमी अभियान करित असते.

ग्रामीण भागातील बचत गटांनी तयार केलेले फराळ, दिवणार, बांबू पासून तयार केलेले आकाश दिवे, इत्यादी वस्तू पंचायत समिती च्या आवारात विक्रीस उपलब्ध आहे.

करिता मूल वासियांनी एक भेट अशीही देऊन वस्तू खरेदी करण्याचे आव्हान पंचायत समिती मूल  करण्यात आले आहे.