चंद्रपूर जिल्ह्य पद्मशाली समाज संघटनेची विशेष सभा मार्कंडेय मंंदीर ,महाकाली मंदिराजवळ घेण्यात आली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.बंडूभाऊ आ.आकनुरवार होते. प्रमुख अतिथी अखिल भारतीय पद्मशाली महासभेचे सदस्य शंंकर दिगदेवतुलवार, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्रावण गुंडेटीवार,सहसचिव विलास सोमलवार, डोनय्या अंकम, शहर उपाध्यक्ष मोरेश्वर कुरेवार, सचिव राजूभाऊ यंगलवार,प्रभारी सचिव तुलशीदास मारशेट्टीवार होते.प्रथम महा मुनी मार्कंडेश्वराची पुजा करण्यात आली.यावेळी डॉ बंडूभाऊ आकनुरवार यांनी 2 टक्के एसबीसी आरक्षण, महर्षी मार्कंडेय आथीँक विकास महामंडळ ,मा.मुख्य मंत्री महोदयानी महाराष्ट्र राज्य विणकर मंडळासोबत झालेल्या चर्चेची माहीती देऊन राज्यस्तरीय होणार्या वधु-वर परीचय मेळावाची नोंदणी बाबत व शंकर दिगदेवतुलवार यांनी समाज संघटन व प्रबोधन काळाची गरज असुन संघटना जिल्ह्यत प्रबोधनात्मक बैठकाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मार्गदर्शन केले.सभेचे संचालन व आभार तुळशीदास मारशेट्टीवार यांनी केले.सभेला महेश नाडमवार, अरूण चिंतलवार, महेश कानमपल्लीवार, सुरेश वडलकोंडावार,मार्कडी आकनुरवार,मोरेश्वर अनमलवार, रुपेश मुलकावार सह समाजबांधव उपस्थित होते.