शहरातील व्यापारी प्रतिष्ठाणे गजबजलेलीच ,भाऊबिजेलाही बाजारपेठेत चैतन्य, खरेदीसाठी गर्दी !
दिवाळी प्रकाशाचा व उत्सवाचा सण मानला जातो. नुकतेच लक्ष्मीपूजन उरकले. लक्ष्मीच्या पूजनासाठी कपडे, दागिने व अन्य साहित्य खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या होत्या. आता भाऊबिजेला सुद्धा शहरातील बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण पहावयास मिळत आहे. भाऊबिजेच्या खरेदीसाठी बहिणींची गर्दी बाजारात दिसून आली. दिवाळी सणानिमित्ताने व्यापारीवर्गाची लाखोंची कमाई होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
दिवाळीत लक्ष्मीपूजनानंतर सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे भाऊबिजेचा असतो. लग्नानंतर पहिल्यांदा दिवाळीनिमित्त वडिलांच्या पर्यायाने भावाच्या घरी जाण्याची हुरहुर बहिनींच्या मनात असते. तर अन्य महिला सुद्धा दिवाळीच्या सणात ओळावणीसाठी भावाच्या घरी येत असतात. त्यामुळेच हिंदूधर्मीय दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. आतापर्यंत बाजारात दिवाळीनिमित्त घरांची सजावट, फराळ, फटाके, कपडे, दागीने व अन्य प्रकारच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. मात्र, मंगळवारला भाऊबिजेनिमित्त बाजारात चांगलीच गर्दी दिसून आली. भाऊबिजेपासून उत्सवाला प्रारंभ होतो. भाऊबिजेच्या दिवशी अथवा गावातील
मंडईच्या दिवशी बहिण भावाच्या घरी येवून भावाला ओवाळणी घालते. विविध वस्तूंची भेट देते तर भाऊही बहिनींच्या प्रेमाची परतफेड मोठी भेट देवून करीत असतो. ही परंपरा अनेक वर्षांपासून कायम आहे. यामुळेच आता दिवाळीची खरेदी संपल्यानंतर बाजारात भाऊबिजेसाठीची गर्दी दिसून येत आहे. बुधवारी (दि. १५) भाऊबीज असल्यामुळे मंगळवारला खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली होती.