२९ हजार ग्रामपंचायतीमधील संगणकपरिचालकाचे १७ नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन

63

संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची प्रमुख मागणी

मूल:ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागा अंतर्गत “आपले सरकार” प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर संगणकपरिचालक कार्यरत असून ११ वर्ष काम केलेल्या संगणकपरिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेने केली आहे.या मागणीसाठी राज्य संघटनेच्या वतीने १७ नोव्हेंबर पासून राज्यभरात कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले असून मागणी मान्य होईपर्यंत कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली आहे.संग्राम व आपले सरकार या दोन प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर राज्यातील संगणकपरिचालक काम करत आहेत.परंतु शासनाकडून संगणकपरिचालकाना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देण्याच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.ग्रामविकास विभागाने १४ जानेवारी २०२१ रोजी च्या शासन निर्णयात घेतलेल्या निर्णयानुसार अगोदर असलेल्या तुटपुंज्या ६ हजार रूपये मानधनात एक हजार रुपये वाढ केली.आज महागाईच्या काळात ७ हजार रूपयाच्या मासिक मानधनात संगणकपरिचालकानी स्वतःचा व कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न असताना वारंवार आश्वासन देऊन सुद्धा निर्णय होताना दिसत नाही.गतवर्षी नागपुर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संघटनेच्या वतीने २७ व २८ डिसेंबर रोजी मोर्चा काडून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते त्याची दखल घेत राज्याचे ग्रामविकासमंत्री यांनी मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन दिले मात्र काहीच निर्णय घेण्यात न आल्याने रज्यासंघटनेच्या वतीने १७ नोव्हेंबर २०२३ पासून ग्रामपंचायत स्तरावर संगणकपरिचालकांना असलेली सर्व कामे बंद ठेऊन बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.अशा आहेत मागण्या:ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधात संगणक परिचालकाना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे,संगणक परिचालकाना तत्काळ २० हजार मासिक मानधन देणे,नव्याने सुरू केलेली टार्गेट सिस्टीम रद्द करणे अशा मागण्या घेऊन काम बंद आंदोलन करण्यात आले आहे.संगणक परिचालकांचा जास्त अंत न बघता महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या यावलकर समितीच्या शिफारशीनुसार संगणकपरिचालकांना सुधारित आकृतीबंधात ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याबाबत निर्णय घ्यावा.:धनराज रामटेके तालुकाध्यक्ष म.रा.स.परिचालक संघटना मुल