‘विश्वकर्मा योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा’: सिएससी संचालक प्रमोद मशाखेत्री

115

विश्वकर्मा या योजनेचा  पारंपरिक व्यावसायिकांनी नावनोंदणी करून लाभ घ्यावा व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन सिएससी संचालक प्रमोद मशाखेत्री यांनी केले.

कुणाला फायदा ?
चर्मकार, गवंडी, सोनार, शिंपी, सुतार, शिल्पकार, जाळी तयार करणे, कुंभार, टेलर, लोहार यासह एकूण १८ पारंपरिक कामे करणाऱ्यांसाठी विश्वकर्मा योजना आणण्यात आली आहे.
कसा मिळेल योजनेचा लाभ?
प्रशिक्षणादरम्यान दररोज ५०० रुपये मानधनही दिले जाणार आहे. नवी साधने खरेदी करण्यासाठी सरकार १५ हजार रुपयांची मदत करणार आहे. कामगारांना १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. एक लाखाच्या मदतीनंतर पुढील टप्प्यात २ लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. याचवेळी सरकार ब्रॅंडिंग, ऑनलाइन मार्केट अॅक्सेस यासाठी मदत करेल. प्रथमच १८ पारंपरिक व्यापाऱ्यांचा समावेश केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी समोर ठेवून समाजातील सर्व घटकांचा विचार करून पंतप्रधान विश्वकर्मा ही योजना सुरू केली आहे, असेही  म्हणाले. 

या विश्वकर्मा योजनेविषयी माहिती सांगितले की, योजनेच्या अंतर्गत पारंपरिक व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांसाठी या योजनेच्या अंतर्गत पाच दिवसांचे प्रशिक्षण वर्ग  देण्यात येणार आहे. यासाठी त्यांना पाच दिवस सुमारे अडीच हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये खर्च देण्यात येईल. या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा, 

योजनेची नोंदणी करण्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, फोटो, बँकविषयी माहिती, बँक खाते क्रमांक, उत्पन्न प्रमाणपत्र आदी याविषयी कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. 

– हे प्रशिक्षण वर्ग घेतल्यानंतर त्या व्यक्तीला आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी लागत असलेले साहित्य, मशीन खरेदी करण्यासाठी १५ हजार रुपये या योजनेअंतर्गत देण्यात येतील. तसेच १ लाख रुपये ४ टक्के व्याजानुसारही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.- या प्रशिक्षण वर्गात व पारंपरिक व्यवसाय सुरु करण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांनी सीएससी यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करावी व ही नोंदणी झाल्यानंतर अर्ज केलेल्या व्यक्तींना प्रशिक्षणासाठी फोन करून माहिती देण्यात येणार आहे.