राज्यस्तरीय एकपात्री नाट्य प्रयोग स्पर्धेत राज्यातून मुलमाऊंट कॉन्व्हेंट ची विद्यार्थिनी कु. किमया किरण खोब्रागडे, राज्यातून प्रथम क्रमांक

55

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शालेय शिक्षण व साक्षरता विभाग आणि एनसीईआरटी नवी दिल्ली ,महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कला उत्सव दिनांक 21 नोव्हेंबर 2023 ते 24/ 11 /2023 या कालावधीत महात्मा फुले राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये राज्यस्तरीय एकपात्री नाट्य प्रयोग स्पर्धेत राज्यातून मुल जिल्हा चंद्रपूर येथील माऊंट कॉन्व्हेंट ची विद्यार्थिनी कु. किमया किरण खोब्रागडे, राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला असून राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झालेली आहे. कु्. किमया किरण खोब्रागडे व पालकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा💐👏👏👏👏