गौरी बोरकुटे वेट लिफ्टिंग स्पर्धेत प्रथम

64

 गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग
स्पर्धा निवड चाचणी गोंडवाना सैनिकी विद्यालयात पार पडली. यात रा.महात्मा गांधी महाविद्यालय
सावलीची खेळाडू गौरी बोरकुटे हिने ४९ किलो वजनी गटात प्रथम स्थान प्राप्त केले. ती बीएससी तृतीय वर्षात शिकत आहे. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये तिची निवड झाली आणि तिला गोंडवाना विद्यापीठ कलर होल्डरचा सन्मान मिळाला. त्याबद्दल शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. भास्कर सुकारे, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे, मंडळाचे अध्यक्ष संदीप गड्डमवार,उपाध्यक्ष अनिल स्वामी, मंडळाचे सचिव राजाबाळ पाटील संगीडवारआदी उपस्थित होते.