कृषी महाविद्यालय मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रम

52

नैसर्गिक शेती करणे आज फार महत्वाचे आहे. आणि त्यानुसार आपल्या पर्यावरणाचा आणि आपला समतोल साधने अत्यंत आवश्यक आहे. आणि नैसर्गिक शेती करणे हे प्रत्यक्षात शक्य आहे. परंतु हे अधिक प्रभावीपणे करण्यासाठी शेतकऱ्यांचे संघटन असणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे संघटन असेल तर नैसर्गिक शेती करणे शक्य आहे

कृषी महाविद्याहय मूल द्वारा आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची अकरावी बैठक दिनांक २९ नोव्हेंबर २०२३ रोजी येसगाव ता. मूल येथे संपन्न झाली. या प्रसंगी कृषी महाविद्यालय, मूल चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत एस. टेकाळे, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष मा. विजय गुरनुले, शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मूल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती.

या बैठकीत मुख्यत्ये “ धान काढणी पश्चात तंत्रज्ञान व भाजीपाला पिकाचे नियोजन” या विषयावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सहयोगी अधिष्ठाता डॉ. विष्णुकांत एस. टेकाळे यांनी धान काढणी नंतर त्यातील ओलाव्याचे प्रमाण तपासून मळणी करावी त्पामुळे दाना तुटणार नाही व संपूर्ण दाण्याचे प्रमाण वाढेल. तसेच शेतकऱ्यांनी धान पिकामध्ये यांत्रिककरणाचा अवलंब करावा असे आवाहन केले.

‘कृषीविद्या शास्त्रज्ञ डॉ. विजय राऊत यांनी गहू व हरभरा पिकाची उत्पादन वाढीसाठी तन व्यवस्थापन या विषयी सविरतर माहिती दिली. उद्यानविद्या शास्त्रश डॉ. स्वप्नील देशमुख यांनी कारल्याची लागवड मंडप पद्धतीने केल्यास अंधिक उत्पादन मिळवता येईल असे सांगितले.

तसेच भाजीपाला पिकांमध्ये मुळा, वाटाणा, टरबूज आणि खरबूज या पिकांची लागवड करून अधिक नफा कसा मिळवता येईल याबद्दल माहिती दिली.

किटकऱास्त्रज्ञ डॉ. अर्चना बोरकर यांनी वांगी, कोबी, भेडी व चवळी पिकावर येणाऱ्या रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव अरासायानिक पद्धतीने कसा कमी करावा या बद्दल माहिती दिली. डॉ. प्रविणा बरडे, वनस्पती रोगशास्त्रज्ञ यांनी वांगी, कोबी, भेंडी व चवळी पिकावरील येणाऱ्या रोगांची ओळख कशी करावी व त्यांचे नियोजन कसे करावे या बद्दल सविस्तर माहिती पटवून दिली.

डॉ. शिल्पा देशमुख, कृषि अभियंता यांनी धान पिक काढणी पश्चात तंत्रज्ञान, धानाची साठवणूक कशी करावी, तसेच धानाच्या कोंड्यापासून पशुखाद्य कसे तयार करावे याबद्दल माहिती दिली. वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. दिनेश नवलकर यांनी धान पिकातील धसकटे कापणी झाल्यानंतर १५ दिवसाच्या आता काढून टाकावे त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा ऱ्हास होणार नाही या बद्दल सविस्तर माहिती पटवून दिली.

सदर कार्यक्रमास एकुण २० शेतकरी व शास्त्रज़ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. विजय राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.