साहित्यामुळे देशाची संस्कृती जिवंत-राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर

47

मूल, ता. :- साहित्यामुळे या देशाची संस्कृती जिवंत आहे. त्यासाठी लिखाण करणाऱ्यांचा नेहमी सन्मान झाला पाहिजे. प्रत्येक बोली भाषा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. भाषा, बोली जिवंत ठेवण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, असे मत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी केले.
येथील बालविकास प्राथमिक शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ साहित्य नगरीत झालेल्या पहिल्या महिला झाडीबोली साहित्य संमेलनप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. पहिल्या महिला झाडीबोली साहित्य संमेलनाचे उदघाटन हंसराज अहीर यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ साहित्यिक शशिकला गावतुरे या संमेलनाध्यक्ष होत्या. महिला झाडीबोली साहित्य मंडळाच्या अध्यक्षा तथा माजी नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर या स्वागताध्यक्ष होत्या. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकात लेनगुरे, प्रभाकर भोयर, नंदू रणदिवे, प्रशांत समर्थ, प्रवीण मोहुलें, रूपेश मारकवार, सादमवार, गावतुरे यांची उपस्थिती होती.