मूल तालुक्यात जागतिक दिव्यांग समता सप्ताह

49

मूल : समग्र शिक्षा समावेशित शिक्षण गटसाधन केंद्र पंचायत समिती मूलच्या वतीने जागतिक दिव्यांग समता सप्ताह निमित्त मूल तालुक्यात विविध उपक्रम व स्पर्धा घेऊन शालेय स्तरावर साजराकरण्यात आला.

पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी वर्षा पिपरे यांच्यामार्गदर्शनाखाली विविध माध्यमांच्याशाळांमध्ये समावेशित अनेक उपक्रमघेण्यात आले.

या सप्ताहात शाळेतजनजागृतीपर कार्यक्रम घेऊन दिव्यांग दिनाचे महत्त्व समजावून सांगणे, दिव्यांग विद्यार्थ्यांना गृहभेट देऊन व त्यांचा सत्कार करून पालकांना वसमाजाला जागृत करणे,

शालेयदिव्यांग विद्यार्थ्यांच्या ऑनलाइनवेशभूषा स्पर्धा घेणे, शाळेत चित्रकला,रांगोळी व इतर मैदानी खेळ घेऊनदिव्यांग विद्यार्थ्यांतसमाजातीलविविध क्षेत्रात समान संधी देण्याचाप्रयत्न करण्यात आला.
उपक्रम यशस्वी होण्याकरिता समावेशित शिक्षण तज्ज्ञ विवेक डांगे, संतोष सोनवणे,

विशेष शिक्षक यशवंत शेट्टे, ईश्वर लोनबले, नीलेश शेनमारे, स्वप्निल मेश्राम व गट साधन केंद्र मूल येथील विषय तज्ज्ञांनी परिश्रम घेतले.