ग्रामपंचायत मारोडा येथे आधार शिबीराचा लाभ घ्यावा— उपसरपंच अनुप नेरलवार

55

गरज लागल्यानंतर आयत्यावेळी धावपळ करण्याऐवजी वेळेतच आपले आधार कार्ड अपडेट करून घेण्याचा सल्ला

मूल :— मारोडा येथील उपसरंपच अनुप नेरवार यांच्या प्रयत्नातून उद्यापासून ग्रामपंचायत मारोडा येथे आधार शिबीराचा आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराचा मारोडा परीसरातील नागरीकांनी आधार शिबाराचा जास्तीत जास्त व्यक्तीनी लाभ घ्यावा.असे आवाहन पराग खोब्रागडे आधार संचालक तहसील कार्यालय मूल यांनी केले आहे.

नागरिकांसाठी आधार कार्ड हे देशांतर्गत ओळखपत्र बनले आहे. शाळेत प्रवेश घेण्यापासून ते निवृत्तीपर्यंतच्या प्रत्येक कामासाठी आधार कार्ड आवश्यक असते. गरज लागल्यानंतर आयत्यावेळी धावपळ करण्याऐवजी वेळेतच आपले आधार कार्ड अपडेट करून घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
ज्या नागरिकांना आधार कार्ड काढून दहा वर्षे होऊन गेली आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे. भारत सरकारकडून अशा नागरिकांना आपल्याबाबतची सर्व माहिती पुन्हा एकदा देण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

आधार कार्ड हा ओळख आणि पत्ता, या दोन्ही गोष्टींचा पुरावा मानला जातो. मात्र ज्यांना आधार कार्ड काढून दहा वर्षे होऊन गेली आहेत, त्यांचा पत्ता बदललेला असण्याची शक्यता असते. त्यामुळेच नागरिकांनी आपला पत्ता आणि आपली ओळख याबाबतचे तपशील पुन्हा एकदा सादर करून, आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे, असे आवाहन सरकारने केले आहे.
ज्यांना आधार कार्ड काढून दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे आणि गेल्या दहा वर्षात त्यांनी आपली माहिती अपडेट केलेली नाही. जर गेल्या दहा वर्षात तुम्ही माहिती अपडेट केली असेल तर तुम्हाला पुन्हा अपडेट करण्याची गरज नाही, असेही सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आला आहे.

आधार कार्डमधील काही माहिती अपडेट करण्यासाठी आधार शिबारावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण केल्यास तुम्हाला कमीत कमी शुल्क द्यावे लागेल.UIDAI ने 10 वर्षांपेक्षा अधिक जुन्या आधार कार्ड धारकांना त्यांची माहिती अपडेट करण्याचे आवाहन केले आहे.
नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता आणि भाषा बदलवू शकता, त्यात बदल करु शकता. दुरुस्तीसाठी, सुधारणेसाठी तुमचा दहा अंकी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करून मिळेल

जन्मतारीख अपडेट करण्यासाठी जन्मप्रमाणपत्राची स्कॅन कॉपीची गरज पडते
भारतात आधार कार्ड (Aadhar Card) हे एक अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. आजकाल प्रत्येक सरकारी कामासाठी ओळखपत्र (Identity Card) म्हणून आधार कार्डची गरज भासत असते. कुठल्याही छोट्यामोठ्या सवलतीपासून ते बँकेत खातं उघडण्यापर्यंत आणि ड्रायव्हिंग लायसन्सपासून ते घर खरेदीपर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड मागितले जाते. आपल्या पत्त्याचे आणि ओळखीचे इतरही अनेक पुरावे असले, तरी सध्या भारतातील अनेक योजना या आधार कार्डशी निगडित आहेत. त्यामुळे प्रत्येकाकडे आधार कार्ड असावे, यासाठी भारत सरकार प्रयत्नशील असते. अधिकाधिक नागरिकांनी आधार कार्ड काढावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असतात. आता ज्यांना आधार कार्ड काढून दहापेक्षा जास्त वर्षे झाली आहेत,त्यांच्यासाठी सरकारने एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. आपली ओळख आणि पत्ता यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी नव्याने पुरावे देण्याची सूचना सरकारने केली आहे.