पंचायत समिती राबविणार योजना
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घ्या
विविध भागांतील पावसाचे आगमन व असमान वितरण आणि पावसातील अनियमित येणारे खंड, या प्रमुख आपत्ती येत असतात. यामुळे सिंचनाअभावी मोठ्या प्रमाणात घट येते. अशात मुख्यमंत्री शाश्वत सिंचन वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ओढे, नदी, नाले इत्यादीद्वारे वाहून जाणारे पाणी त्याची साठवणूक करण्याकरिता शेतावर
शेततळ्यासारखी पायाभत सविधा उभी करण्यास चालना देणे हा एक उपाय आहे. शेतकऱ्यांना शेततळे खोदण्याकरिता अनुदान देय आहे. याकरिता मुख्यमंत्री शाश्वत कृती कृषी सिंचन योजनेंतर्गत व्यक्ती क्षेत्र ही योजना राबविण्यात येत आहे. लाभार्थी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर किमान एक एकर जमीन असणे आवश्यक आहे. शेततळ्याला लागणारी जागा शेतकऱ्याने विनामूल्य द्यायची आहे.
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनांतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमान रक्कम ७५ हजार रुपये अनुदान देय आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ७/१२, ८अ, आधार कार्ड, बँक पासबुक आदी माहिती घेऊन पोर्टलवर अर्ज करायचा आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून राबविला जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
शेततळे करणार क्रांती
■ धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी शेततळ्यांची योजना पंचायत समितीच्या माध्यमातून राबविली जात आहे. या माध्यमातून शेतीला सिंचनाची शाश्वत सोय व्हावी अशी भूमिका आहे. सिंचनाची सोय नसलेल्या शेतकऱ्यांना यातून धान जगविता येईल. सोबतच मत्स्य व्यवसायदेखील करता येईल.