युवा क्रांति तर्फे मूख्यमंत्री शिंदे यांना निवेदन

104

युवा क्रांति तर्फे मूख्यमंत्री शिंदे यांना निवेदन 1)पोलीस भरती2)मूल शहरातील मुलींची छेडखणी3)शेतकरी पीक विमा4)अवेध धंदे

राज्यात नवीन आकृतीबंधानुसार मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात यावी यासाठी निधी उपलब्ध करून पोलीस भरती घेण्यात यावी येत्या काळात राज्यात तात्काळ पोलीस शिपयांची पदभरती घेण्यात यावी यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
तसेच मूल शहर तंबाखू गुटका अमली पदार्थांच्या विळख्यात सापडले आहे. ग्रामीण भागातही पोंभुर्णा वरून मूल गुटका तंबाखू अमली पदार्थांची विक्री अन् पिणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचे भयानक वास्तव दिसून येत आहे.
मूल शहराची ओळख शांतता प्रिय अशी आहे . पण, ती आता तंबाखू गांजा हब अशी झाली दिसून येत आहे. गुन्हेगारीच्या बाबतीत बोलल्यास गुन्हेगारीने बरबटलेले शहर अशीही या शहराची ओळख होऊ पाहत आहे.

शहरात चोरटे सहजच लूटमार करत आहेत. त्यासोबतच तंबाखू अमली पदार्थांची तस्करीदेखील शहरात जोमात सुरू आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवायांमध्ये सातत्य राहिल्यास त्याला बर्‍याच प्रमाणात अटकाव घालता येईल. फक्त किरकोळ विक्रेते न पकडता त्यांना पुरवठा करणारे म्होरके देखील पकडण्याची कामगिरी पोलिसांना करावी. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तरच अशा गोष्टींवर आळा घालणे शक्य होणार आहे अशी मागणी निवेदना मार्फत करण्यात आली आहे.

तसेंच मूल शहरातील अवेध धंद्यामुळे मुलींची छेडखणी मोठ्या प्रमाणात वाढणात दिसून येत आहे. मुलींच्या छेडखानीच्या तक्रार मध्ये तात्काळ चौकशी करून मुल शहरात दामिनी पथकाची नियुक्ती करण्यात यावी अशी चर्चा करून युवा क्रांति तर्फे निवेदन देण्यात आले