मुख्याधिकारी मूल साहेबांना निवेदन@जानेवारी 2020 ला मंजूर झालेल्या पंतप्रधान आवास योजनेचे उर्वरित अनुदान केव्हा मिळणार साहेब

63

साहेब, उसनवार पैसे घेऊन बांधले हो घरकूल !

पंतप्रधान आवास योजनेचा निधी मागील तीन वर्षांपासून नगर परिषदेला अप्राप्त आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम उसनवार घेऊन पूर्ण केले. निधी आल्यावर उसनवारीचे रुपये देण्याचे आश्वासन लाभार्थ्यांनी दिले होते. आता ते लाभार्थ्यांकडे पैशाचा तगादा लावत असल्याने लाभार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आज ना उद्या निधी येईल, या आशेवर असलेल्या लाभार्थ्यांचा भ्रमनिरास होत आहे. परिणामी लाभार्थी चातकासारखी निधीची वाट बघत आहेत.
नगर परिषद मूल अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेसाठी दोन लाख मिळाले 30 हजार रूपये प्रत्येकी
आतापर्यंत दिला नाही.सन जानेवारी 2020 ला मंजूर झालेल्या पंतप्रधान आवास योजनेचे उर्वरित अनुदान मुल नगरपरिषद अंतर्गत जानेवारी 2020 ला मंजुर केलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल धारकांना या चार वर्षादरम्यान फक्त दोन लाख विस हजार रूपये देण्यात आले.या दरम्यान सर्व घरकुल धारकांची घरे बांधून तयार झालेली आहे.उर्वरीत तीस हजार रूपायाकरीता नगर परिषदे कडे वारंवार विनंती अर्ज करूनही आमच्या समस्येकडे दुर्लक्ष करीतआहे.
तरी आपण आमच्या समस्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आम्हाला सहकार्य अश्या प्रकारचे अर्ज श्रीमान मुख्याधिकारी साहेब नगर परिषद मूल यांना अनिल गुरनुले यांनी अर्ज दिलेलें आहे.

अनेक लाभार्थ्यांनी उसनवार रुपये मागून घरासाठी खर्च केले आहे. बराच कालावधी लोटल्याने समोरील व्यक्ती उसनवारीची व्याजासहित रक्कम मागत आहे.

लोकप्रतिधिनींकडून केवळ आश्वासन
धनादेशाबाबत नगर परिषदेत विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर कर्मचारी अपमानास्पद भाषेचा वापर करून हाकलून लावत असल्याचे लाभार्थी सांगतात. बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना अनेकदा निवेदन देण्यात येऊन निधी मिळवून देण्याची मागणी केली. मात्र आश्वासनापलिकडे काहीच मिळाले नसल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. एकीकडे अर्धवट घर तर दुसरीकडे उसनवारीचे पैसे या विवंचनेत पंतप्रधान आवास योजनेचा लाभार्थी अडकला आहे.

पंतप्रधान आवास योजनेचा निधी लवकर मिळेल या आशेवर उसनवार करून घराचे बांधकाम केले. 30,000 RS  निधी न आल्याने पैसे अडून पडले आहेत. उसनवारी पैशावर व्याज देताना त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी शासनाने त्वरित निधी द्यावा.
-वसंता कवडू गुरनुले,लाभार्थी मूल