मूल मध्ये !धानाच्या भावासाठी एकदिवसीय धरणे@महाराष्ट्र तेली समाज आरक्षण संघर्ष समिती

59

महाराष्ट्र तेली समाज आरक्षण संघर्ष समिती
 वेळी अवेळी पडणाऱ्या पावसामुळे यंदा धानाच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यातही धानाचा भाव अत्यल्प आहे. त्यामुळे शेतीला लावलेला खर्चही निघत नसल्याने धानाला कमीत कमीत तीन हजार रुपये हमीभाव द्यावा, या मागणीला घेऊन महाराष्ट्र तेली समाज आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने समितीचे संयोजक योगेश समरीत यांच्या नेतृत्वात मूलमध्ये एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. दरवर्षी शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांना सामोर जावे लागते. यंदाही पावसामुळे धानाच्या उतारीत मोठी घट झाली आहे. त्यातच भावही अल्प आहे. तसेच यंदा बोनसही जाहीर
झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघेनासा झाला आहे. त्यामुळे धानाला तीन हजार हमीभाव देण्याच्या मागणीसाठी धरणेआंदोलन करण्यात आले. यावेळी आरक्षण संघर्ष समितीचे संयोजक योगेश समरीत, अविनाश भुरसे, मनोहर चालाख, भाऊराव कोठारे, संतोष
अशा आहेत मागण्या धानाला कमीत कमी तीन हजार रुपये भाव द्यावा, धान खरेदीवर बोनस देण्यात यावा, रानडुकराला वन्यप्राणी अधिनियमामधून वगळण्यात यावे, वन्यप्राण्यांमुळे जे शेतीचे नुकसान होत आहे, त्याकरिता वनविभागाला मोबदला द्यावा, वीज कोसळू नयेम्हणून १४०० २१४०० ग्रामपंचायतीमध्ये २१कोटी खर्च करून संयंत्र बसविण्यात आले होते. तरीही अनेक शेतकरी वीज कोसळून मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे संयंत्र बसविणाऱ्या कंपन्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा मृत शेतकऱ्याला पाच लाख रुपये द्यावे.नैताम, मनोहर कुकडे, तुळशीराम कुनघाडकर, पितांबर वासेकर, ठिवरु भुरसे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.