ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तीन दिवसीय ‘काम बंद’ आंदोलन सोमवारी सुरू केले आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतनश्रेणी, निवृत्ती वेतन तसेच ग्रामपंचायतस्तरावरील प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाकडून संप सुरू केले असल्याचे सांगितले. कर्मचारी या काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.
सरपंच, ग्रामसेवक, वरिष्ठ लिपिक, लिपिक, ग्रामपंचायत संगणकचालक, करवसुली कर्मचारी, सफाई कामगार, पाणीपुरवठा कामगार, वीजपुरवठा कामगार या काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. ग्रामपंचायतीचे कामबंद ठेवण्यात आल्याने गावगाडा ठप्प मूल येथे कामबंद आंदोलन करताना ग्रामपंचायतचे कर्मचारी. ग्रामपंचायत कर्मचारी
नगरपरिषद व जि. प. कर्मचायांप्रमाणे वेतनश्रेणी व निवृत्ती वेतन, उपदान लागू करावी, सुधारित किमान वेतन व वेतनासाठी लादलेली वसुलीची अट रद्द करावी, आकृतिबंधात सुधारणा, एकूण रिक्त पदांच्या १० टक्के प्रमाणे वर्ग ३ व वर्ग ४ पदावर नियुक्ती करावी, ऑगस्ट २०२२ ते मार्च २०२२ पर्यंतचे थकीत वेतन अदा करावे, आदी मागण्यांसाठी ग्रा.पं. कर्मचायांनी बंद पुकारला आहे.मानधनात भरीव वाढ व्हावी, मानधनाची शंभर टक्के रक्कम शासनानेच द्यावी, विनाकारण कामावरून कमी केलेल्या ग्रामसेवकांना परत कामावर घेण्यात यावे, नगरपालिका कर्मचाऱ्यांसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही दर्जा देऊन वेतन देण्यात यावे, यासह संगणक चालकांच्या मागण्यांसाठी हे तीन दिवसीय आंदोलन पुकारण्यात आले आहे. याबाबत संघाचे अध्यक्ष अशोक गायकवाड म्हणाले, आम्ही मंत्र्यांना निवेदन दिले आहे. सर्व संघटना एकत्रित येऊन काम बंद आंदोलन करत आहोत. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे.