मूल तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात

46

मूल तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात
मूल : येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.यावेळी नंदा आनंदराव शेंडे पोलिस पाटील खालवसपेठ यांनी सुमधुर आवाजात ग्राहक गीत सादर केले. ग्राहक हा राजा आहे. ग्राहकांनी आपले हित जोपासावे. ग्राहक देवो भव हा आमचा संकल्प असून उत्पादनात वाढ , वितरणात समानता व उपभओगआवर संयम या त्रिसुत्रीवर ग्राहक पंचायतीचे कार्य सुरू आहे.
मूल येथील तहसिल कार्यालयात आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

व्यासपीठावर ग्राहक पंचायत महाराष्ट मुल तालुका अध्यक्ष पत्रकार दीपक देशपांडे, शशिकांत धर्माधिकारी सर, उपाध्यक्ष अशोक मैदमवार,सचिव बादल करपे, सहसंघटक राहूल आगडे, कार्यकारिणी सदस्य रमेश डांगरे, प्रमोद मशाखेत्री,आदि उपस्थित होते.
यावेळी दीपक देशपांडे यांनी ग्राहक हा अर्थव्यस्थेचा कणा असून त्याने आपले हक्क व कर्तव्ये जाणून घेतली पाहिजेत. कोणतीही वस्तू विकत घेताना त्याची पक्की पावती घेतल्यास फसवणूक झाली तर ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे दाद मागता येईल.

त्यासाठी प्रत्येक ग्राहकाने खरेदी करताना खबरदारी घेण्याचे व प्रत्येक गोष्ट खरेदी करताना पावती मागण्यांचेआवाहन केले. यावेळी पुढे बोलताना ग्राहक संरक्षण कायदा व त्यामागची पार्श्वभूमी विशद केली.

याप्रसंगी अशोक मैदमवार आणि धर्माधिकारी सर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी केले.नायब तहसिलदा ओंकार ठाकरे यांनी सूत्रसंचालन करून आभार प्रदर्शन केले.
याप्रसंगी स्वस्त धान्य दुकान संघटनेचे तालुकाध्यक्ष यांचेसह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील, व्यापारी, शासकीय विभागांचे विभागप्रमुख, कर्मचाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.