मुल येथील शेतकऱ्यांच्या खात्यात मदत कधी? : तहसिल,बँकेकडे चौकशीसाठी पायपीट

93

केवायसी केली… थम्ब लावला….त्यानंतरही वाटेला प्रतीक्षाच

गतवर्षी सन 2022-2023 उन्हाळातील महिन्यांच्या दरम्यान सततच्या पावसामुळे रबी पिक, मका, हरभरा व इतर पिक पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या आक्रोशामुळे शासनाने सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याचा निर्णय घेतला.

इपंचनामा या संकेतस्थळावर वरून आधार प्रमाणीकरण करण्यात आले. काही शेतक—यांना पैसे मिळाले काही शेतक—यांना अजून पर्यंत पैसे मिळाले नसून काही शेतकरी आधार प्रमाणीकरण होत नसल्यानाने प्रशासनाने बदल नाराजी व्यक्त केलेली आहे.

संबंधित ग्रामपंचायतीत शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित झाल्या.
केवायसी, थम्बची अट शासनाने व प्रशासनाने घातल्याने शेतकऱ्यांनी जवळपासच्या सेतू केंद्रांची वाट धरली. त्याला आता बराच कालावधी लोटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झालेली नाही. बँकेकडे चौकशीसाठी त्यांची पायपीट होत आहे. शेतकऱ्यांचे नाव व त्यांच्या नावापुढे हेक्टरी क्षेत्रफळानुसार रक्कम असे प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये नमूद आहे.

थम्ब लावून केवायसी केल्यानंतरच खात्यात पैसे जमा होतील, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये असल्याने यादीमध्ये नाव आलेल्यांनी एकच गर्दी करून संबंधित सेतू केंद्रावर केवायसी करून घेतली.
परंतु, 04 महिने होऊनसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याची ओरड आता शेतकऱ्यांकडून सुरू आहे. किसान योजनेचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असूनही पुन्हा आधार प्रमाणीकरण कशासाठी, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. आधार प्रमाणीकरणाकरिता शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
मी थम्ब लावून केवायसी केली.04 महिनेहोऊनसुद्धा मंजूर झालेली मदतबँकेत जमा झाली नाही. या संदर्भाततहसीलदारांना मी स्वतः फोन केला असता,त्यांनी पैसे येतील, असे सांगितले.
-रमेश पाल, शेतकरी

बँकेने शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करायला सांगितले होते. त्या अनुषंगाने शेतकरी सेतू केंद्रावरयेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून देत आहे.
– शुभम भसराकर,
मूल,सेतू सुविधा केंद्र