मुख्य अभियंता धनंजय चामलवार यांचा पद्मशाली समाजाच्या वतीने सपत्नीक सत्कार

125

पद्मशाली समाज संघटना नागपुर , चंद्रपूर व विदर्भ पद्मशाली संघमच्या वतीने मार्कंडेय सभागृह, मानेवाडा रोड नागपूर येथे मुख्य अभियंता धनंजय चामलवार यांचा पदोन्नतीनिमीत्याने सपत्नीक सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला.
या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भ पद्मशाली संघमचे अध्यक्ष मा.संजय बोम्मावार होते.प्रमुख अतिथी नागपूर समाज संघटनेचे अध्यक्ष मा.राजूभाऊ नागुलवार, चंद्रपूर जिल्हा समाज संघटना तथा विदर्भ पद्मशाली कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. बंडू आकनुरवार, विदर्भ कार्याध्यक्ष साई अल्लेवार,संजय कटकमवार,विदर्भ महीला अध्यक्ष रश्मी परसावार, सत्कारमूर्ती मुख्य अभियंता धनंजय चामलवार, सौ. सरोज ध.चामलवार होते. प्रथम नागपूर पद्मशाली समाज संघटना,विदर्भ पद्मशाली संघम, चंद्रपूर जिल्ह्य पद्मशाली समाज संघटना,विदर्भ पद्मशाली कर्मचारी संघटना,चंद्रपुर जिल्ह्य अभियंता संघटना व विदर्भ व नागपूर पद्मशाली महीला समाज संघटनेकडून नागपूर येथे अधिक्षक अभियंता पदावर कार्यरत असलेले मा.धनंजय चामलवार सर यांचे राज्य शासनाने मुख्य अभियंता ,मुंबई महानगर MMRDA या पदावर पदोन्नती केलेली असल्याने त्याप्रित्यर्थ मा.धनंजय चामलवार यांचा सपत्नीक शाल श्रीफळ देऊन सत्कार करून गौरविण्यात आला.यावेळी सत्कारमूर्ती धनंजय चामलवार यांनी शिस्त, जिद्द,परिश्रम,अपेक्षा न करता प्रामाणिकपणे केलेली सेवा व जिवनातील अनुभव कथन करून प्रेरणादायी मार्गदर्शन केले.सोबतच विदर्भ अध्यक्ष संजय बोम्मावार, नागपूर अध्यक्ष राजूभाऊ नागुलवार, चंद्रपूर जिल्ह्य अध्यक्ष डॉ.बंडू आकनुरवार,संजय कटकमवार, साई अल्लेवार,सौ.सरोज ध.चामलवार, बहीण सौ.शरयुताई पंदिलवार यांनी शुभेच्छासह मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन आनंद आकनुरवार आभार सौ.रश्मीताई परसावार यांनी केले.कार्यक्रमाला निलेश गाजीमवार, तारकेश्वर उडतेवार, प्रकाश इजमुलवार, सुरेश पेदुलवार,राजेश दुस्सावार, मोहन सुंचावार,चंद्रपूर जिल्ह्य अभियंता अध्यक्ष राजेंद्र कटकमवार, चंद्रपूर जिल्ह्य सचिव तुलशीदास मारशेट्टीवार,विदर्भ कर्मचारी संघटना सह सचिव सोनल येनगंधलवार,पवन बेतवार, रवी गाजीमवार,सौ.राखीताई नागुलवार,सौ.सुनंदाताई गोशिकवार,सौ.वर्षा नागुलवार,प्रियाताई इजमुलवार, जयश्रीताई कुरेवार व पद्मशाली समाज बांधव,भगीनी उपस्थित होते.

शब्दांकन- डॉ.बंडूभाऊ आकनुरवार