मूल शहरातील गांधी चौकातील पेट्रोल पंपावर सकाळी गर्दी पाहायला मिळत होती. पेट्रोल मिळणार नाही या भीतीपोटी पेट्रोल पंपावर रात्री अशी गर्दी झाली.केंद्र सरकारच्या मोटार वाहन कायद्याला मूल तालूक्यात विरोध
अन्यायकारक कायदा असल्याचा वाहन चालकांचा आरोप मूल तालूक्यातील आॅटो चालक सुध्दा करीत होते.
केंद्र सरकारने नवा मोटार वाहन कायदा तयार केला. हा कायदा अन्यायकारक असल्याचा आरोप करून वाहनचालक संघटनांनी सोमवारी आंदोलन केले. नवीन मोटार वाहन कायद्यानुसार ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तत्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न केल्यास आणि ट्रकचालक दोषी आढळून आल्यास त्याला सात वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. या तरतुदीला वाहनचालक संघटनांनी विरोध दर्शविला आहे.
केंद्र सरकारने आणलेल्या नव्या मोटार वाहन कायद्या विरोधात टँकरचालकांनी संप पुकारत आणलेला नवीन कायदा रद्द करा, अशी मागणी करत बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरचालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे.