फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर व्दारा संचालित एफ.ई.एस.गल्स॔ काॅलेज चंद्रपूर येथील रासेयो विभागाद्वारा. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ मिनाक्षी ठोंबरे, प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ.अनिता वाऴके, प्रा.डॉ.राजेश चिमनकर,प्रा.आमरपाली देवगडे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे,प्रा.डाॅ.प्रज्ञा जुनघरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रभारी प्राचार्य डॉ मिनाक्षी ठोंबरे यानी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या काया॔विषयी व जीवना बाबत माहिती दिली.प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या कर्मवीर महाविद्यालय मूल च्या प्राचार्य डॉ अनिता वाळके यानी आपल्या मार्गदशनात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या काळातील समाजव्यवस्था ,तत्कालीन समाजात असलेल्या बालविवाह,सतीची चाल , केशवपन ह्या सामाजिक प्रथा , सावित्रीबाईने स्त्री मुक्ती साठी काढलेला शिक्षणाचा मार्ग हा स्त्री स्वातंत्र्याच्या कल्पनांना साकार रूप देणारा आहे म्हणून पहिला मानाचा मुजरा त्यानांच केला पाहिजे असे मत व्यक्त केले.प्रा डॉ राजेश चिमनकर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले याना शिक्षिका म्हणून कार्य करताना आलेल्या अडचनी बाबत माहिती दिली प्रा. आम्रपाली देवगडे यानी सुध्दा कार्यक्रमास अनुसरून आपले विचार व्यक्त केले तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत गीत सादर केले कु. प्रज्ञा साखरकर व कू. अंजली दानव या विद्यार्थीनींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल विचार व्यक्त केले तर प्रा. डॉ. अंजली ठेपाले धाबेकर मॅडम नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर वर स्वरचित कविता सादर केली.
प्राचार्य डॉ अनिता वाळके यांचा क्रांतिज्योती फुले यांच्या जयंतीनिमित्त
प्राचार्य डॉ मिनाक्षी ठोंबरे यानी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रज्ञा जुनघरे तर आभार डॉ राजेंद्र बारसागडे यांनी मानले
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनीची मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा लोकेश दरवे ,बंडु वरवाडे, रमेश गुरनुले,नथ्थुजी कांबडी ,रमेश गुरनुले मोलाचे सहकार्य लाभले