नवीन रजिस्टशन चालू@प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी अटींची पूर्तता करा

94

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) रुपये २ हजार प्रतिहप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यांत प्रतिवर्षी रुपये सहा हजार लाभ अदा करण्यात येत आहे.

लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे इ- केवायसी केलेले शेतकरी कुटुंब पीएम किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीनुसार जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांचा योजनेच्या लाभासाठी समावेश करण्यास अद्यापही वाव आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ६ डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०१४ या कालातशीन
गावपातळीवर ४५ दिवसांची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या अनुषंगाने आयुक्त कृषी डॉ. प्रवीण गेडाम यांनी महसूल, ग्रामविकास व कृषी या विभागांनी समन्वयाने राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेत समाविष्ट करण्यासाठी या विशेष मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

या मोहिमेमध्ये लाभार्थ्यांची स्वयंनोंदणी व ई- केवायसीसाठी राज्यातील सर्व सामायिक सुविधा केंद्र, तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे

. पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक केलेल्या बाबींची पूर्तता केलेल्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ केंद्र शासन अदा करत आहे.

त्यामुळे भूमी अभिलेख नोंदीनुसार जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न  लाभाथ्र्यांेनी पुर्तता करून घ्यावी.