शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) रुपये २ हजार प्रतिहप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यांत प्रतिवर्षी रुपये सहा हजार लाभ अदा करण्यात येत आहे.
लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे इ- केवायसी केलेले शेतकरी कुटुंब पीएम किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीनुसार जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांचा योजनेच्या लाभासाठी समावेश करण्यास अद्यापही वाव आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ६ डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०१४ या कालातशीन
गावपातळीवर ४५ दिवसांची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या अनुषंगाने आयुक्त कृषी डॉ. प्रवीण गेडाम यांनी महसूल, ग्रामविकास व कृषी या विभागांनी समन्वयाने राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेत समाविष्ट करण्यासाठी या विशेष मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
या मोहिमेमध्ये लाभार्थ्यांची स्वयंनोंदणी व ई- केवायसीसाठी राज्यातील सर्व सामायिक सुविधा केंद्र, तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे
. पीएम किसान योजनेच्या लाभासाठी बंधनकारक केलेल्या बाबींची पूर्तता केलेल्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ केंद्र शासन अदा करत आहे.
त्यामुळे भूमी अभिलेख नोंदीनुसार जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न लाभाथ्र्यांेनी पुर्तता करून घ्यावी.