राज्यांतर्गत १६ सीईटीकरिता नोंदणी सुरूराज्य सरकारच्या सामाईकप्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीहोणाऱ्या १६ सीईटींकरिता ऑनलाइन
नोंदणी सुरू करण्यात आली आहे. सीईटी सेलने या परीक्षांच्या तात्पुरत्या तारखाही जाहीर केल्या
आहेत.
सीईटीसेलच्यायासंकेतस्थळावर अर्ज नोंदणी करता येईल. बीएड, एमएड (तीन वर्षांचा इंटिग्रेटेड), एमएड, एमपीएड, बीपीएड, बीएड (जनरल आणि स्पेशल) आणि बीएड ईएलसीटी, एलएलबी (तीन वर्षे), बीए-बीएस्सी व बीएड, एमबीए, एमएमएस, एम एमआर्क, एम एचएमसीटी, एमसीए, बी डिझाईन, बी
तृतीयपंथींसाठी शुल्क कमीतृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी सीईटीचे शुल्क कमी करण्यात आले आहे. एससी, एसटी, ईडब्ल्यूएस कोट्यातील विद्यार्थ्यांकडून जितके शुल्क आकारले जाते तितकेच शुल्क तृतीयपंथीय विद्यार्थ्यांकडून आकारले जाणार आहे.
एचएमसीटी या सीईटींकरिता नोंदणी सुरू झाली आहे. १६ जानेवारीपासून एमएचटी-सीईटीकरिता नोंदणी सुरू
होईल. तर १८ जानेवारीपासूनएलएलबी (पाच वर्षे) या सीईटीकरिता नोंदणी सुरू होईल.